मुंबई: ‘मुख्यमंत्र्यांनी सरकारची सकारात्मक बाजू सांगितली, पण शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातच का होतात?’ असा सवाल विचारत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली. एबीपी माझाच्या व्हिजन व्हिजन पुढच्या दशकाचं या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.


शेतकरी पहिल्यांदाच संपावर गेला

सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पण त्याआधी शेतकऱ्याला संपावर जावं लागलं. ही देशातील पहिलीच घटना आहे. राज्यात सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला देशात समान भाव देण्याची गरज आहे. असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

समृद्धी महामार्गाचा अट्टाहास कशाला?

समृद्धी महामार्गाचा अट्टाहास कशाला असा सवालही यावेळी अशोक चव्हाणांनी उपस्थित केला. समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध असताना अशावेळी सरकारनं यासाठी अट्टाहास करणं चुकीचं आहे. त्यामुळे हायवेचं रुंदीकरण करा, नव्याने जमीन अधिग्रहित करण्याची गरज काय? असा सवालही त्यांनी विचारला.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं व्हिजन:

महाराष्ट्रातील आमचं योगदान सकारात्मकच राहिल : अशोक चव्हाण

राज्यात जातीय सलोखा निर्माण करणं गरजेचं : अशोक चव्हाण

तरुणांसाठी रोजगारनिर्मिती होणं आवश्यक : अशोक चव्हाण

शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी यंत्रणा हवी : अशोक चव्हाण

समृद्धी महामार्गाचा अट्टाहास कशाला? हायवेचं रुंदीकरण करा, नव्याने जमीन अधिग्रहित करण्याची गरज काय?: अशोक चव्हाण

योजनांचा निधी तळागाळापर्यंत पोहोचायला हवा : अशोक चव्हाण

समन्यायी पाणीवाटपावर विचार होण्याची गरज : अशोक चव्हाण

शेतमालाला देशात समान भाव द्यावा : अशोक चव्हाण

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर सपोर्ट प्राईज वाढवण्याची गरज : अशोक चव्हाण

आयात निर्यातीचा समतोल राखणं गरजेचं : अशोक चव्हाण

शेतकरी पहिल्यांदाच संपावर गेला : अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी सरकारची सकारात्मक बाजू सांगितली,पण सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात का होतात?:चव्हाण

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन

LIVE : दिग्गजांचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी : मुख्यमंत्री