एक्स्प्लोर

अजोय मेहतांनंतर कोण? कुणाला मिळणार संधी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडून मेहतांच्या बाजूने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा तसा कौल नाहीय. त्यामुळे सध्या मेहतांना बाजूला करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढलाय. मागच्या कॅबिनेटमध्ये सचिव विरुद्ध मंत्री राडाही पाहायला मिळाला.

मुंबई : एकीकडे निसर्ग वादळांनं थैमान घातलेलं असताना ठाकरे सरकारमध्ये सुद्धा मुख्य सचिव अजोय मेहताविरोधात एक अंतर्गत वादळ निर्माण झालंय. मेहता हटाव असा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून नारा देण्यात आलाय. त्यामुळे मेहतांवर ठाकरे मेहरबान असले तरी मेहता यांना आता जावंच लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे मेहतांनंतर कोण येणार याची चर्चा जास्त रंगू लागलीय.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोण? अजोय मेहतांची पुन्हा वर्णी लागणार? सिताराम कुंटे किंवा संजय कुमार यांना संधी मिळणार? महाविकास आघाडीमध्ये सध्या ही जोरदार चर्चा सुरु झालीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडून मेहतांच्या बाजूने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा तसा कौल नाहीय. त्यामुळे सध्या मेहतांना बाजूला करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढलाय. मागच्या कॅबिनेटमध्ये सचिव विरुद्ध मंत्री राडाही पाहायला मिळाला. याचनिमित्तानं मेहता हटाव हा नारा देण्यात आला. पण अजोय मेहतांना बाजूला केले तर दुसरं कुणाला आणायचं? यावर लॉबिंग सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याआधीच तिसर्‍यांदा अजोय मेहतांचा कार्यकाळ वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारला पत्रं पाठवलं आहे. अजोय मेहता यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कनेक्शन पाहता तिसरी टर्म पदरात पाडून घेतील, असे संकेत आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेहतांच्या विरोधात मोर्चेबांधणी केलीय आणि याचाच प्रत्यय मागच्या कॅबिनेटमध्ये आला. छगन भुजबळांच्या खात्याचा प्रस्ताव सचिवांनी मंत्र्यांना विश्वासात न घेता सादर केल्यानं खंडाजंगी झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. त्यामुळे अजोय मेहतांच्या विरोधातलं वातावरण तयार झालंय. अजोय मेहतांनंतर पहिलं नाव अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार याचं आहे. संजय कुमार हे अजोय मेहतांच्याच 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुळचे बिहारी असलेले संजय कुमार हे देखील दीर्घ अनुभवी आहेत. पण त्यांना मागील नऊ महिन्यांत मुख्य सचिव होण्याची संधी मिळाली नसल्यानं ते प्रतिक्षेत आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार संजय कुमार यांना संधी मिळू शकते.

मराठी विरुद्ध अमराठी हा वाद अधिकाऱ्यांमध्ये असतो. त्यामुळे अमराठी अधिकारी निवडायचा झाला तर नंबर लागतो. सिताराम कुंटे हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 1 मे 2012 ते 28 एप्रिल 2015 पर्यंत त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदा सोबत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमचा सीताराम कुटेंना चांगलाच अनुभव आहे.

त्यासोबत अर्थ, हाउसिंग, प्लॅनिंग विभागाची त्याच्या पाठिशी दांडगा अनुभव आहे. त्यात शांत स्वभाव, मोजकेच बोलणं आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध ही कुंटेंची जमेची बाजू आहे. त्यानंतर तिसरं नाव प्रविण परदेशी यांचं येतं. प्रविण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 13 मे 2019 ला मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. एका वर्षाच्या आत उचलबांगडी करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रधान सचिव आणि नंतर अपर मुख्य सचिवपदी बढती झाली. पण सध्या कोरोनाच्या काळात प्रविण परदेशींच्या कामागिरीवर नाखूश होऊन ठाकरे सरकारनं त्यानं मुंबई पालिका आयुक्त पदावर हटवलं. त्यामुळे परदेशींची शक्यता धुसरच दिसतेय. निर्णय कोणताही असो यामध्ये शरद पवारांचा सल्ला महत्वाचा असणार आहे. त्यामुळे जो कोणीही अधिकारी नेमला जाईल, त्याचं पवार कनेक्शनही तितकच महत्वाचं ठरणार आहे. कारण शेवटी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी पवार फॅक्टर याही वेळेला दिसेल अशीच चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget