मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीची चर्चा राज्यात जोरदार सुरु आहे. आयकर विभागाच्या धाडीमध्ये यशवंत जाधव यांची डायरी आयकर विभागाला मिळाली. आता डायरीत नोंद केलेल्या मातोश्री नेमक्या कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण जाधव यांच्या डायरीत याच मातोश्रींना दोन कोटी रुपये आणि पन्नास लाख रुपयांचे घड्याळ दिले असल्याची नोंद आहे. आता जाधव यांच्या मते फोन केलेल्या मातोश्री या त्यांच्या आईच आहेत. पण खरंच आपल्या आईला दिलेल्या पैशांचा हिशोब याची नोंद यशवंत जाधव यांनी डायरीत करुन ठेवली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.


मागील महिन्यात यशवंत जाधव यांच्या घरावर त्यांच्या संपत्तीवर सोबत त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्या. या आयकर विभागाच्या धाडीनंतर सगळ्यात जास्त चर्चा होते ती यशवंत जाधव यांच्या डायरीची. कारण याच डायरीमध्ये यशवंत जाधव यांच्या हिशोबाच्या नोंदी आहेत. त्यात दोन कोटी रुपये आणि पन्नास लाख रुपयांच्या घड्याळीची नोंद मातोश्रीच्या नावे आहे. मात्र नोंद मातोश्री या आपल्या आई असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला असल्याची आयकर विभागातील सूत्रांची माहिती आहे. आता या मातोश्रीच्या नोंदीवर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.


यशवंत जाधव यांनी मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो असे उत्तर दिले आहे. बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात. काही जण आई म्हणतात तर काही मातोश्री म्हणतात. ते स्वतः सांगत असताना तुम्हा त्याला अधिक उकळी देण्याचे काम का करत आहात, अजित पवार म्हणाले.


'मातोश्री'ला म्हणजे आईला असू शकत शकत नाही का? महाराष्ट्रामध्ये दानधर्म करण्याची एक परंपरा आहे, मी यशवंत जाधव यांचे वक्तव्य पाहिलं. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले, असं संजय राऊत म्हणाले. 


महाविकास आघाडीतील नेते जरी यशवंत जाधव यांची बाजू घेऊन डायरीतील मातोश्री या यशवंत जाधव यांच्या आईचा असल्याचे ठामपणे म्हणत असले तरी या सगळ्या प्रकरणी ईडीने चौकशी करावी आणि डायरीतील मातोश्री म्हणजे नेमकं कोण? याचा तपास करावा अशी मागणी विरोधक करत आहे.


मात्र या डायरीतील मातोश्री संदर्भात सुरु असलेल्या चर्चेमध्ये काही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतात. आपण खरंच आईला मातोश्री म्हणतो का? आईला दिलेला पैशाची नोंद डायरीत करतो का? दोन कोटी किंवा घड्याळासाठी पन्नास लाख एवढे रुपये आईच्या नावाने नोंद करतो का? हे प्रश्न आम्ही सर्वसामान्यांकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आईला मातोश्री म्हणता का? आईला दिलेल्या पैशाची नोंद होते का? हिशोबाच्या या डायरीत आईसाठी पैसे देऊन ठेवले आहेत का? असे प्रश्न विचारण्यात आला. 


हिशोब कोटींचा आहे, पैसे मातोश्रीच्या नावावर नोंद आहेत. मातोश्रीला दिलेल्या खर्चाची नोंद डायरीत आहे आणि या डायरीची सर्वत्र चर्चा आहे. आता उत्सुकता आहे एकाच प्रश्नाच्या उत्तराची...डायरीत नोंद असलेल्या मातोश्री नेमक्या कोण? आणि या प्रश्नाचे उत्तर तपास यंत्रणांकडून लवकरच समोर येईल अशी अपेक्षा केली जात आहे.


संबंधित बातम्या