Sanjay Raut On Yashwant Jadhav : सध्या शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav)  यांच्याकडे आयकर विभागाला सापडलेल्या डायरीतील काही गोष्टींमुळं वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. या डायरीत 'मातोश्री'ला (Matoshree) दोन कोटी आणि 50 लाखांचं घड्याळ दिलं असल्याचा उल्लेख आहे. याबाबत आज बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत म्हणाले की, 'मातोश्री'ला म्हणजे आईला असू शकत शकत नाही का?.  महाराष्ट्रामध्ये दानधर्म करण्याची एक परंपरा आहे, मी त्यांचे वक्तव्य पाहिलं. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले, असं राऊत म्हणाले. 


 डायरी हा काही पुरावा असू शकत नाही-  राऊत


संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेत डायरी वगैरे लिहिण्याची पद्धत नाही. डायरी वगैरे गंमत वाटते. खोटे पुरावे,  खोटे गुन्हे दाखल करतात. अशा डायऱ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात हे सीबीआयने भाजप नेत्यांची नावं आली तेव्हा सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे.  डायरी हा काही पुरावा असू शकत नाही, असं राऊत म्हणाले. 


जोवर उद्योग वाढत नाहीत सार्वजनिक उपक्रमांना ताकत मिळणार नाही तोवर रोजगार वाढणार नाही. आतापर्यंत लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार हा सरकारी उद्योगांनी दिला आहे. मात्र भाजप सरकारनं दोन पाच आपल्या मर्जीतील उद्योजकांच्या हाती देश दिला आहे. यामुळं काही मोजक्या लोकांची संपत्ती वाढणार आहे आणि पर्यायानं भाजपची संपत्ती वाढेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. 


संजय राऊत म्हणाले की, देवाच्या चरणी सर्वांनी खरं बोललं पाहिजे. जर तुम्ही हिंदुत्व मानत असाल तर देवाच्या दरबारात आपण किती खरं बोलतो हे काही लोकांनी तपासायला हवं. महाराष्ट्रात षडयंत्र सुरु आहेत, कटकारस्थानं सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी करणं सुरु आहे. सध्या विरोधी पक्षाचं खोटं बोला पण रेटून बोला ही परंपरा सुरु आहे. 


नाणारच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, स्थानिकांचं मतपरिवर्तन झाल्याचं ऐकलं नाही. धर्मेंद्र प्रधान आता देशाचे शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी त्याकडे लक्ष द्यावं, ते चांगले मंत्री आहेत, असं राऊत म्हणाले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या