एक्स्प्लोर

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचा अजेंडा काय? 

एनडीएतील सर्वात मोठा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत येत्या लोकसभा निवडणुकीत युती कायम ठेवण्यासाठी व्यवहार्य प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट असेल.

मुंबई: भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याचं निमित्त 'संपर्क फॉर समर्थन' अभियान असलं तरी लोकसभा निवडणुकीची तयारी हा त्यांचा प्रमुख अजेंडा असणार आहे. देशातील बुद्धिजीवी आणि नामवंत व्यक्तींच्या गाठी-भेटीनंतर अमित शहा आज संध्याकाळी राज्याच्या निवडणूक समितीची बैठक घेणार आहेत. या समितीत पक्षातील पहिल्या फळीतील 13 ते 14 सदस्यांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेली तयारी, लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा, उमेदवार छाननी, पालकमंत्र्यांचे दौरे, घटक पक्ष आणि विविध संघटनांची स्थानिक पातळीवरची स्थिती अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय एनडीएतील सर्वात मोठा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत येत्या लोकसभा निवडणुकीत युती कायम ठेवण्यासाठी व्यवहार्य प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट असेल. शिवसेनेसमोर काय असू शकतो भाजपचा प्रस्ताव? आजपर्यंत लोकसभेला शिवसेना-भाजपचा 21 : 27 असा फॉर्म्युला होता. 2014 मध्ये यापैकी 18 खासदार शिवसेनेचे तर 23 खासदार भाजपचे निवडून आले. भंडारा - गोंदिया पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर भाजपचे 22 खासदार राहिले. संख्याबळ राखण्याचं आव्हान केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी असलेल्या जागा राखणं हे भाजप समोरचं सध्याचं मोठं आव्हान आहे. पालघरच्या पोटनिवडणुकीत लोकसभेसाठी पहिल्यांदाच शिवसेना-भाजप वेगळे लढले. भाजपने जरी पालघर राखलं असलं तरी मतांचं विभाजन होऊन टक्केवारी घसरली. तसेच भंडारा-गोंदियात काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन भाजपचा पराभव केला. अशा परिस्थितीत जर 2019 मधल्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधकांनी भाजपविरोधात मोट बांधली, तर भाजपसहित शिवसेनेलाही महाराष्ट्रात मोठा फटका बसेल. त्यामुळे लोकसभेसाठी शिवसेनेनं भाजपची युती अभेद्य ठेवण्यातच शहाणपण असल्याचा प्रस्ताव अमित शहांकडून शिवसेनेसमोर ठेवला जाण्याची शक्यता आहे. मात्र लोकसभेत युती करण्यासाठी शिवसेनेचं मन वळवण्यात शाहांना यश येईल का? आणि बदल्यात शिवसेना पदरात काय पाडून घेईल? तसेच लोकसभेच्या वाटाघाटींवर विधानसभेचं भवितव्य ठरेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या शहा - ठाकरे बैठकीत दडली आहेत. अमित शाहा 'मातोश्री'वर जाणार! शिवसेनेसोबतचा तणाव टोकाला गेला असताना, आज भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता दोघांची भेट होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय विरोधकांच्या एकजुटीचा सत्ताधारी भाजपने चांगलाचा धसका घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गतच अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संबंधित बातम्या  अमित शाह आज 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंची भेट घेणार!  स्पेशल रिपोर्ट : भाजपवर 'संपर्क फॉर समर्थन'ची वेळ का आली? 

महत्त्वाच्या बातम्या

Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget