मुंबई : उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर आहे. असा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार नितेश राणेंनी केला आहे. एबीपी माझाच्या ‘माझा विशेष’ या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला.


काल (मंगळवार) नारायण राणेंनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत असं म्हटलं होतं की, ‘मला शिवसेनेकडूनही ऑफर होती, पण मी जाणार नाही.’

पण त्यांच्या हा दावा चुकीचा असल्याचं शिवसेना प्रवक्ता निलम गोऱ्हे म्हणाल्या. ‘राणेंना जर शिवसेनेत येणार का? असं कुणी विचारलं असेल तर ते एखाद्या सामान्य शिवसैनिकानं विचारलं असेल. अशी कोणतीही ऑफर त्यांना देण्यात आलेली नाही.’

त्यानंतर याबाबत बोलताना नितेश राणे यांनी खळबळजनक माहिती दिली.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

 

दरम्यान, काल नारायण राणेंनी आपल्याला शिवसेनेकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. तर त्यानंतर नितेश राणेंनी थेट मिलिंद नार्वेकरांचं नाव घेत आपल्याला शिवसेनेत ऑफर असल्याचं म्हटल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे.



मला शिवसेनेकडूनही ऑफर होती : नारायण राणे

‘मला शिवसेनेकडून ऑफर होती. त्यांच्यातील काही जणांनी मला सांगितलं की, तुम्ही अमुकांना भेटा, भेटायची इच्छा आहे. पण मी सुरुवातीलाच त्या गोष्टीला नकार दिला. मी स्पष्ट शब्दात सांगितलं की, मला शिवसेनेत यायचं नाही.’ असं राणे एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

VIDEO :  मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर, नितेश राणेंचा दावा



संबंधित बातम्या :

VIDEO : मला शिवसेनेकडूनही ऑफर, पण मी जाणार नाही : राणे