मुंबईला पावसाने झोडपलं, कुठे पाणी साचलं, कुठे बस अडकली
चर्चगेटहून रात्री 10.56 ला सुटलेली लोकल पहाटे 5 वाजता विरारला सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व शाळा, कॉलेज आज बंद राहणारवादळी पावसामुळे केळवे बीचवरील सुरुची बाग उद्ध्वस्त
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 20 Sep 2017 09:42 AM (IST)
पालघरच्या केळवे बीच आणि चिंचणी भागात पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे.
पालघर : पालघरच्या केळवे बीच आणि चिंचणी भागात पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. वादळी पावसामुळे केळवे बीच भागातली सुरुची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. कालपासून अविरतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे ही बाग उद्धवस्त झाली आहे. या पावसामुळे चिंचणी भागातील बागायतदारांचे मोठं नुकसान झालं आहे. तर तिकडे पालघर आणि विरारमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विरार स्टेशनबाहेर अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईमध्येही पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. संबंधित बातम्या : राज्यभरात पावसाची नेमकी स्थिती कशी? मुंबईतील तुफान पावसाचा हवाई सेवेलाही फटका, अनेक उड्डाणं रद्द