मुंबई : महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थीतीत मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक पार पडल्यानंतर राऊत बोलत होते.
शिवेसेनेसोबत भाजपने कोणतीही युतीची चर्चा केली नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत शिवसेनाचा मोठा भाऊ ठरेल आणि दिल्लीचे तख्त आम्हीचं हलवणार असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. बैठकीत युतीबाबत चर्चा झालेली नाही, तर लोकसभा निवडणुकांच्यासंदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचे राऊतांनी सांगितले. आगमी लोकसभा निवडणुकांसाठी आम्ही इथे भाजपाच्या प्रपोजलची वाट पहात बसलेलो नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले. तसेचं युतीचा कुठलाही प्रस्ताव भाजपाकडून शिवेसेनेला आलेला नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
बैठकीत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे यावर चर्चा झाली. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार आहोत. तसेच आयकर उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत करावी अशी मागणी देखील अधिवेशनात करणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहणार : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jan 2019 04:21 PM (IST)
बैठकीत युतीबाबत चर्चा झालेली नाही, तर लोकसभा निवडणुकांच्यासंदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचे राऊतांनी सांगितले. आगमी लोकसभा निवडणुकांसाठी आम्ही इथे भाजपाच्या प्रपोजलची वाट पहात बसलेलो नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -