एक्स्प्लोर

नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणं ही भाग्याची गोष्ट : मुख्यमंत्री

ही रिफाईनरी महाराष्ट्रात व्हावी ही आमची भूमिका आहे. जे विरोध करतात त्यांना सांगू इच्छितो संवाद- चर्चातून शंका दूर करावी, महाराष्ट्राच्या फायद्याचा प्रोजेक्ट व्हावा यासाठी आम्ही आग्रही राहू, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

मुंबई:  नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणं ही भाग्याची गोष्ट आहे. काहींचा या प्रकल्पाला विरोध होत आहे, मात्र हा विरोध चर्चेने सोडवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. “मी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. सगळ्यात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात आणत आहेत. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मला वाटते नाणार रिफाईनरी होणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. काही लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत, पण तो विरोध चर्चा करून सोडवू, संघर्ष नाही तर संवादाच्या माध्यमातून विषय संपवावे ही आमची भूमिका आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले. ही रिफाईनरी महाराष्ट्रात व्हावी ही आमची भूमिका आहे. जे विरोध करतात त्यांना सांगू इच्छितो संवाद- चर्चातून शंका दूर करावी, महाराष्ट्राच्या फायद्याचा प्रोजेक्ट व्हावा यासाठी आम्ही आग्रही राहू, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. धर्मेंद्र प्रधान यावेळी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नाणार प्रकल्पावरुन शिवसेनेचं नाव न घेतां सूचक वक्तव्य केलं. मान सन्मान मुद्दा नाही, प्रतिष्ठेचा मुद्दा नाही, शेतकरी वर्गातून मी आलो आहे. जमीन अधिग्रहित करण्याचं दुःख मलाही माहिती आहे. मी खुल्या मनाने चर्चा करू पाहतोय, त्यावर मी सविस्तर ही बोलणार आहे, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. ग्राऊंड झीरो रिपोर्ट : नाणार प्रकल्प काय आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांना भेट नाकारली होती. नाणारच्या प्रकल्पाचा शिवसेनेचा विरोध आहे. उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी आपण त्यांची भेट घेऊ असं धर्मेंद्र प्रधान यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सांगितलं होतं. मात्र आता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशाला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारली. नाणार प्रकल्प ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर  आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाला. काय आहे नाणार प्रकल्प? खनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार आहे जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय ही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे. प्रति दिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार रिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार आहे. नाणार प्रकल्पाला विरोध का? रिफायनरी म्हणजे प्रदूषण हे साधं सरळ समीकरण जगभर आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचं धाबं दणाणलं आहे. या प्रकल्पामुळे काही हजार कलमांचे मालक असलेले अनेक शेतकरी एका दिवसात भूमीहीन होणार आहेत. शेतकऱ्याचा तोंडचा घास तोंडातच अडकला आहे. या प्रकल्पग्रस्त भागात जवळपास 12 लाख आंब्याची झाडं आहेत. तितकीच काजू आणि नारळाची झाडंही आहेत. त्याशिवाय काही हजार एकर भागात भातशेती होते.  याशिवाय नाचणी, वरी, कुळीथ, भाजीपाला याचंही उत्पन्न इथला शेतकरी दरवर्षी घेतो. इथल्या समृद्ध जंगलात वावडिंग, हरडा, चारोळे यांसारख्या अनेक औषधी वनस्पती सापडतात, त्यावर इथल्या भटक्या आणि आदिवासी समाजाचा उदरनिर्वाह चालतो. माधव गाडगीळ समितीने या परिसरातील अनेक गावं ही इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केली आहेत. हा प्रकल्प या गावात नसला तरी या प्रकल्पामुळे नैसर्गिदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशावर विपरित परिणाम होणार आहे. या रिफायनरीमुळे या गावांमधील पिण्याच्या पाण्यावरसुद्धा संकट उभं राहिलंय, अशी भीती गावकऱ्यांना वाटायला लागली आहे. प्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्य जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प जवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी भारतात एवढी मोठी गुंतवणूक कशामुळे? इतर तेल उत्पादक कंपन्यांप्रमाणेच एडनॉक आणि सौदी अरामकोलाही भारतात आपली पकड मजबूत करण्याची इच्छा आहे. भारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते. 2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली. संबंधित बातम्या  उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांना भेट नाकारली    नाणार प्रकल्पाच्या करारावर दिल्लीत स्वाक्षरी  कोकणात ‘नाणार’ काही होत नाही, आम्ही तो घालवलाय : उद्धव ठाकरे 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Mumbai BMC Standing Committee :बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?
बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Embed widget