एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पनवेल महापालिका क्षेत्रात नागरी सुविधांचा बोजवारा
पनवेल महापालिका निर्माण होऊन एक वर्ष उलटून गेलं, तरी अद्यापही नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाही आहेत. संपूर्ण शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. तर 3-4 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं पनवेलकर हैराण झाले आहेत.
पनवेल : पनवेल महापालिका निर्माण होऊन एक वर्ष उलटून गेलं, तरी अद्यापही नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाही आहेत. संपूर्ण शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. तर 3-4 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं पनवेलकर हैराण झाले आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेलं आहे. पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी परिसरात सर्वत्र कचऱ्याचंच साम्राज्य पसरलेलं आहे. त्यातच रहिवासी नावासी संकुलालगत असलेल्या नाल्यातील गाळ काढून रस्त्यावर टाकल्याने, रोगराईला आमंत्रण मिळत आहे.
दुसरीकडे मनपा क्षेत्रातील भागात पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने, रहिवाशी चांगलेच हैराण झाले आहेत. शिवाय, पाणी आले तरी तेही गढूळ मिळत आहे. यामुळे अनेक भागात मोर्चे काढण्यात येत असून, पाणीपुरवठा करण्याऱ्या सिडको कार्यालयाला लोकप्रतिनिधींनी टाळे ठोकले आहेत.
दरम्यान, अच्छे दिन येण्याच्या आशेनं पनवेलकरांनी निवडणुकीत भाजपला मत दिली, मात्र पाणी आणि कचरा नियोजनाच्या सुविधा सिडकोनं महापालिकेकडे हस्तांतरित करवे अशी मागणी भाजप करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement