Mumbai Water Shortage: संपूर्ण मुंबईला(Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये(Dam) फक्त 26 टक्केच पाणीसाठा आता शिल्लक राहीला आहे. मागील वर्षी याच काळात हा पाणीसाठा 30 टक्के होता मात्र आता हा पाणीसाठा कमी झाल्याचं पहायला मिळतयं. तसेच यावर्षी कमी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.याचसाठी मुंबईला अतिरिक्त साठा मिळावा अशी मागणी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला केली आहे.  त्यामुळे आता ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट येणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


मुंबईच्या आजूबाजूला जरी समुद्र असला तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणारे स्रोत तसे  ठरावीकच आहेत. मुंबईला सात धराणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमध्ये विहार, तुळशी, तानसा, भातसा, मोडक, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा. परंतु या सातही धरणांमध्ये मिळून फक्त 26 टक्केच पाणीसाठा मुंबईकरांसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


मुंबईकर सध्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे या दिवसांत पाणी कपात होणं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल. त्यामुळे मुंबईकरांनी आता पाणी जपून वापरण्याची गरज आहे. तसेच येत्या काळात मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्यचा प्रश्न देखील गंभीर होतोय की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


मुंबई महानगरपालिकेने देखील राज्य सरकारला पत्र लिहून अतिरिक्त पाण्याचा साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली आहे. हे पत्र आता मंत्रालयात असून राज्य सरकार आता त्यावर योग्य निर्णय लवकरच घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. फक्त 26 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे मुंबईकरांसाठी आता पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा 30 टक्के होता त्यामुळे पाण्याच्या टंचाईची फारशी भिती नव्हती. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण देखील कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. 


हा पाणीसाठा येणाऱ्या काळात आणखी कमी झाला तर मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागेल असे देखील सांगण्यात येत आहे. आधीच मुंबईचा उकाडा त्यात कमी पावसाचा अंदाज आणि आता कमी पाणीसाठा त्यांमुळे मुंबईकरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न येत्या पुढील काही काळात निर्माण होणार असल्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. 


 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ajit Pawar on Raj Thackrey: काकांवर लक्ष ठेवा! राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...