एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यात जलवाहिनी दुरूस्तीचं काम, बुधवारी पाणीपुरवठा बंद
ठाणे: ठाण्यात बुधवारी सकाळी 9 ते गुरूवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरण आणि महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीचं दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी 24 तासासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. तसंच या शटडाऊनमुळं पुढचे दोन दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.
या कालावधीत महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement