एक्स्प्लोर

ठाणे महापालिका प्रभाग रचना जाहीर ; कोणत्या पक्षाला होणार फायदा?

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाली. प्रभाग रचनेमुळे नगरसेवकांच्या संख्येत 131 वरून 142 झाली आहे. 

मुंबई : आगामी निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाली. मागील निवडणुकीत चार नगरसेवकांचा एक वॉर्ड होता. त्यावेळेस जी लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती तीच लोकसंख्या आता तीन वॉर्डच्या एका पॅनलसाठी गृहीत धरण्यात आल्याचे दिसत आहे. तीन वार्डचा एक प्रभाग झाल्याने नगरसेवकांच्या संख्येत 131 वरून 142 पर्यंत वाढ झाली आहे. 

या प्रभाग रचनेवर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना पडलेल्या मतांचा प्रभाव देखील दिसून आला आहे. जिथे शिवसेनेला जास्त मते होती त्या ठिकाणी नगरसेवकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे कळवा - मुंब्रा विधानसभा मतदारसंघासह दिव्याचा विचार केल्यास येथे 47 चे थेट 52 नगरसेवक होणार आहेत.

ठाणे, कोपरी - पाचपाखाडी आणि अर्धा ओवळा माजिवडा असे मिळून यापूर्वी पालिकेवर 84 नगरसेवक निवडून जात होते. त्यात आता 6 नगरसेवकांची वाढीव भर पडणार असून येथून आता 90 नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर कही खुशी कही गम अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. वर्तकनगर भागात एक वॉर्ड यापूर्वी 39 हजार लोकसंख्येचा होता, तो आता 24 हजार लोकसंख्येवर आला आहे. त्यातही अनेक ठिकाणी रस्त्यांची सीमा न धरता सोसायटींच्या इमारतींची सीमा धरण्यात आल्याचेही दिसत आहे. कळवा, मुंब्य्रातील वॉर्डात देखील अनेक फेरबदल झाल्याचे दिसत आहे.

या प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थेट फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मताधिक्य असलेल्या ठिकाणीच नगरसेवकांचे वॉर्ड वाढले असल्यामुळे देखील भाजपला यावेळी सर्व शक्ती पणाला लावून लढावे लागणार असल्याचे चित्र आहे. याप्रमाणेच प्रभागांचे सीमांकन करत असताना रस्त्यांच्या ऐवजी सोसायटीच्या भिंतींच्या सीमा ठरल्या आहेत. त्यामुळे देखील मोठे बदल झालेले दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

कोरोनाचा खोटा अहवाल देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमधील हरित ऊर्जा क्षेत्रात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीची गरज
धाराशिवमधील हरित ऊर्जा क्षेत्रात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीची गरज
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Amit Thackeray Speech: अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?
अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
Embed widget