एक्स्प्लोर

सायन पोटनिवडणूक : शिवसेनेविरोधात काँग्रेसची शिवसैनिकाला उमेदवारी

या प्रभागात आज (शुक्रवारी 6 एप्रिलला) मतदान होत असून शनिवारी निकाल जाहीर होणार आहे. शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने या पोटनिवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक 173 चे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. या प्रभागात आज (शुक्रवारी 6 एप्रिलला) मतदान होत असून शनिवारी निकाल जाहीर होणार आहे. शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने या पोटनिवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. सायन प्रभाग क्रमांक 173 मधून शिवसेनेचे प्रल्हाद ठोंबरे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांची प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र काही कालावधीत त्यांचे निधन झालं. रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने रामदास कांबळे आणि संदीप कांबळे या दोन भावांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. शिवसेनेच्या विरोधात दिवंगत नगरसेवक ठोंबरे यांचे भाऊ बापू ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामुळे शिवसेनेची मतं फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण शिवसेनेने ठोंबरे यांची समजूत काढून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं. ठोंबरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी, ठोंबरे यांना मानणारे शिवसैनिक कमालीचे नाराज आहेत. त्यात काँग्रेसने शिवसैनिक असलेल्या सुनील शेट्ये यांना उमेदवारी देऊन, शिवसेनेची मतं कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभाग 21 मधील भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड भाजपाने प्रभाग क्रमांक 173 मध्ये उमेदवार न देता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपने या प्रभागात आपला उमेदवार न देता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे रामदास कांबळे, काँग्रेसचे सुनील शेट्ये आणि अपक्ष असलेले गौतम झेंडे आपले नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी 24 मतदान केंद्रावर 32 हजार 851 मतदार मतदान करणार आहेत. यात 17 हजार 566 पुरुष आणि 15 हजार 194 महिला मतदार आहेत. शनिवारी 7 एप्रिलला पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget