सध्या पावसाने उघडीप घेतली असून तापमान वाढू लागलं आहे. या काळात वातावरणातली आर्द्रता वाढल्याने रोगांच्या विषाणूंचा प्रसार वेगाने होतो. पाळीव प्राणी, गायी-म्हशी आणि प्रामुख्याने उंदराच्या मलमूत्रातून 'लेप्टोस्पायरा' या विषाणूची निर्मिती आणि प्रसार होतो. आपल्या पायाला जखम झाली असेल आणि रस्त्यावर पडलेल्या अशा मलमूत्राशी आपला संपर्क आला, तर 'लेप्टो'ची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे तबेले, अस्वच्छ वस्त्या अशा भागात 'लेप्टो'चा प्रसार होतो.
तर डेंग्यू आणि इतर तापांची लागण ही दूषित पाणी आणि डासांमुळे होत असते. त्यामुळे केडीएमसीच्या आरोग्य विभागाने नागरिकांमध्ये सुरक्षितता बाळगण्याबाबत जनजागृती सुरू केली आहे. घरोघरी जाऊन संशयितांची तपासणी सुरू करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास केडीएमसीच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केडीएमसीचे आरोग्य विभाग प्रमुख आर. डी. लवंगारे यांनी दिली आहे.
कल्याण-डोंबिवलीत साथीच्या आजारांनी बाधित संशयित रुग्णांची संख्या ( १ जून ते ५ सप्टेंबर)
गॅस्ट्रो - १८९,
लेप्टोस्पायरोसिस - ९
डेंग्यू - ४३९
काविळ - १६५
टायफॉईड - ३१७
मलेरिया - १४५
साथीचा ताप - १६, ९४३