Vikhroli Accident News: मुंबईच्या (Mumbai News) ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (Eastern Express Highway) रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात (Accident News) झाला. या अपघातात (Mumbai Accident News) तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या गोदरेज रुग्णालयात (Godrej Hospital) दाखल करण्यात आलं आहे. 


मिलालेल्या माहितीनुसार, एक स्विफ्ट डिझायर गाडी मुंबईहून ठाण्याकडे जात होती. दुसऱ्या बाजूनं एक रेंज रोव्हर डिस्कव्हरी ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जात होती. त्याच दरम्यान स्विफ्ट डिझायरनं दुभाजक तोडून पुलाच्या पलिकडून जाणार्‍या रेंज रोव्हर डिस्कवरीला धडक दिली. यामुळेच अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. दुभाजक तोडून दुसरीकडे गेलेल्या स्विफ्ट डिझायरचंही नुकसान झालं असून त्यात बसलेले 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांच्या मदतीनं तिनही जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या विक्रोळी पोलीस अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत. 


पाहा व्हिडीओ : Mumbai Eastern Expressway : मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस वेवर भीषण आपघात, 3 लोक गंभीर जखमी



विक्रोळीच्या नारायण गोदे उड्डाण पुलावर कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला गेल्यानं दुसऱ्या वाहनांवर धडकली. या भीषण अपघातात एकूण 3 जण जखमी तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.