वसई : वसईच्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात फसवल्याचा आरोप लावत 22 वर्षाच्या विकास झा या तरुणानं काल अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतलं होतं.
स्वतःला पेटवून घेतल्यानंतर विकासनं पोलिसांनाही पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. काल वसई पोलीस अधीक्षक कार्यालयात महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर हा प्रकार घडला.
2014 पासून विकास झावर सात गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र राजकीय पुढारी आणि पोलिसाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याची व्हिडीओ क्लिप विकासनं मित्रांना पाठवल्याची माहिती आहे.
या प्रकरणाला संशयाचं वलय निर्माण झालं असून पालघर पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वसईत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Nov 2017 11:32 PM (IST)
स्वतःला पेटवून घेतल्यानंतर विकासनं पोलिसांनाही पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -