एक्स्प्लोर

लसीकरणासाठी ऑटोमॅटिक स्लॉट्स सिलेक्शनसाठी वसईतील तरुणांचे खास अ‍ॅप

वसई येथील दोन भावांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ऑटोमॅटिक स्लॉट्स सिलेक्शनसाठी खास अ‍ॅप विकसित केलं आहे.

वसई : लसीकरणासाठी शासनाच्या अॅपवर नोंदणी करणं बंधनकारक आहे. असं असलं तरी नोंदणी करताना स्लॉट मिळेलच याची शाश्वती नाही. हिच अडचण वसईतील दोन भावांनी दूर केलीय. त्यांनी ऑटोमॅटिक स्लॉट्स सिलेक्शनसाठी खास अॅपचं तयार केलं आहे.

वसईत राहणारे प्रथमेश घरत आणि अभिषेक घरत या दोन सख्ख्या भावांनी हे अ‍ॅप विकसीत केलंय. ऑटो वॅक सॅक म्हणजेच ऑटोमॅटिक व्हॅक्सीनेशन स्लॉट अव्हेलबिलीटी चेकर नावाचं हे अ‍ॅप आहे. यामध्ये आपण आपला पिन कोड टाकून ठेवल्यास आपल्या जवळच्या भागातील सर्व ओपन लसीकरणासाठीचे स्लॉट्स माहिती पडतील. इतकाच काय तर स्लॉट्स ओपन असल्यास आपल्याला या टूलमध्ये अलार्म सुद्धा वाजेल जेणेकरून स्लॉट्स बुक करता येईल. देशभरातील कुठेही ऑटोमॅटिक स्लॉट्स बुक या टूलने अगदी काही सेकंदामध्ये करता येईल. जेणेकरून तासनतास मॅन्युएली स्लॉट्स कुठे आहेत हे शोधण्याची गरज राहणार नाही.

प्रथमेश आणि अभिषेकने 2014 साली KraftPixel ही स्वतःची कंपनी काढली. या कंपनीच्या माध्यमातून दोघा भावांनी अनेक वेब डेव्हलेपमेंट केले आहेत. त्यातील एक म्हणजे राज्य निवडणुका आयोगासाठी मुंबई महानगरपालिकेवेळी महावोटर हे अ‍ॅप विकसित केलं. ज्या माध्यमातून पोल बूथ सर्च करण्यासाठी मतदारांना फार मदत झाली होती. आताही या कोरोना काळात आपला नंबर कुठल्या स्लॉटवर लागेल ही माहिती जाणून घेण्यासाठी, सर्वसामान्य नागरीकांना हा अ‍ॅप खुप मदत करेल हे नक्की.

देशभरात लसीकरणाने 20 कोटींचा टप्पा ओलांडला
कोरोना संसर्गाविरोधात लढण्यासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेने महत्त्वचा टप्पा गाठला आहे. देशभरात लसीकरणाचे आकडा 20 कोटीच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भारताने सुमारे 15.7 कोटी लोकांना 20 कोटीपेक्षा जास्त लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी 11.3 कोटी लोकांना फक्त पहिला डोस मिळाला आहे, तर 4.35 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 20 कोटी डोसपैकी 20 टक्के लस आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. 18-44 वयोगटातील 6.4 टक्के आणि उर्वरित 73.6 टक्के डोस 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Koyna Dam Water Dispute : कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? जाणून घ्या राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
Rohit Pawar : आंदोलन करताना पक्षाचं चिन्ह का वापरत नाही? पक्षापासून फारकत घेताय का? रोहित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली
आंदोलन करताना पक्षाचं चिन्ह का वापरत नाही? पक्षापासून फारकत घेताय का? रोहित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली
Rohit Pawar and Sharad Pawar: महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget