Vasai Virar City Municipal Corporation : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील आदिवासी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी. वसई विरार महानगरपालिकेनं आदिवासी बांधवाचे वनहक्क दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आता प्रभाग स्थरावर वनहक्क समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे गेल्या 15 वर्षांपासूनचा वनहक्क जमिनीचा लढा आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपंचायतीत ही अशा समित्या स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आदिवासी बांधव आणि जंगल यांच नातं अतुट आहे. आदिवासी बांधव गेल्या कित्येक पिढ्या आपल्या उपजिवकेसाठी जंगलपट्टीत भातशेती, फळझाडं लावून आपली घरं वसावून पिढ्यान् पिढ्या राहत आहेत. मात्र त्याची शेती घरं ही वनविभागात येत असल्यानं, पालिका आणि वनविभाग त्यांच्या घरांना आणि शेतींना नोटीसा पाठवून कारवाईचा बडगा उचलत होत्या. वनविभागातील वनजमीनी आपल्या नावावर करण्यासाठी आदिवासी बांधवांनी गेली कित्येक वर्ष लढा लढला. ग्रामीण भागातील वनहक्क जमिनी नावावर करण्यासाठी गाव पतळीवर समित्या स्थापन झाल्या होत्या. मात्र शहरी भागांत वनविभागाचे दावे हातळण्यासाठी समित्या नव्हत्या. त्यामुळे आदिवासी बांधव या मागणीसाठी गेल्या 15 वर्षांपासून संघर्ष करताना दिसून येत होता. अखेर आदिवासी बांधवांच्या लढ्याला यश आलं आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेनं चार प्रभागामध्ये 27 वनहक्क समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यात दावेदार, वनपाल, तळाटी, यांची वनहक्क समिती स्थापन केली आहे. ही समिती आपला अहवाल प्रांत अधिकाऱ्यांना देणार, त्यानंतर प्रांत जिल्हाधिकाऱ्यांकडे तो अहवाल पाठवून त्यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.
वसई विरार शहरी भागांत 2661 दावे प्रलंबीत आहेत. त्यात सर्वाच जास्त दावे हे वाळीव प्रभागात आहेत. वन जमिनी नावावर होणार असली तरी, त्या जमिनीवर कोणतही अनधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे. झालं असेल तर ते वनविभाग आणि पालिकेला त्यावर कारवाईचे आदेश देण्यात येणार आहे. तसेच ज्या वनविभागावर चाळी वसल्या असतील, त्या जमिनीही आदिवासी बांधवाच्या नावावर होणार नाही. त्यामुळे केवळ शेतीसाठीच या वनजमिनी आदिवासी बांधवाना मिळणार आहेत. कित्येक पिढ्या कसत असलेली वनजमिनी आपल्या नावावर होणार असल्यानं आदिवासी बांधांनी आनंद व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai : 'आम्ही करून दाखवले तर तुम्ही गाजर दाखवले' ; शिवसेना-भाजपामध्ये 'बॅनर वॉर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha