Mumbai : डोंबिवलीत (Dombivli) शिवसेना भाजप मध्ये बॅनर वॉर सुरू झालाय. 'डोंबिवलीतील विकासाचे मारेकरी पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच आहेत', असा बॅनर भाजप आमदारांनी लावला होता.त्यानंतर आता शिवसेनेने बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेने बॅनरमध्ये आम्ही करून दाखवले तुम्ही गाजर दाखवलं , तीन वेळा आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी,डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा, तीन कामे तरी दाखवा अस आवाहन भाजप आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan ) यांना करत बॅनरवर गाजराचा फोटो लावला आहे. हा बॅनर केडीएमसीने पोलिसांच्या मदतीने काढला. शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या या बॅनर वॉरची सध्या डोंबिवलीमध्ये चर्चा सुरू आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय. शिवसेना-भाजप नेत्याकडून आरोप-प्रत्यारोपांचे एकही संधी सुटत नाही येत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवी चंद्र रवींद्र भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं होतं. पालक मंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाच्या मारेकरी असल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला होता. आता डोंबिवलीत या आशयाचे बॅनर देखील भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी लावले होते. त्यापाठोपाठ शिवसनेने देखील या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
शिवसेनेने आज डोंबिवली स्टेशन परिसरात बॅनर लावले होते. या बॅनर वर एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे त्यावर फक्त 2 वर्षाच्या काळात 1690 कोटीचे प्रकल्प मार्गी लावून दाखवले अस लिहत कामांची यादी टाकण्यात आली आहे , तर दुसऱ्या बाजूला तीन वेळा आमदार तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी ,डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा , तीन कामे तरी दाखवा अस आवाहन करत गाजराचा फोटो आहे . हे बॅनर डोंबिवली शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले होते .पोलिसांनी केडीएमसी च्या मदतीने सर्व बॅनर तात्काळ काढून टाकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha