वसई : मसाले विक्री करणारा बोगस अस्थिरोगतज्ञ डॉक्टर हेमंत पाटीलचे एकामागून एक भयानक प्रकार उजेडात येत आहेत. चुकीच्या पध्दतीने ऑपरेशन केल्यामुळे वसईतील आठ रुग्णांना कायमचं बिछान्यातच बसवलं आहेच. हा डॉक्टर स्त्रीलंपट असल्याचं आता उघड झालं असून त्याच्या 72 गर्लफ्रेन्ड आणि नऊ विवाहाचे प्रकरण समोर आलं आहे. आता त्याने अनेक महिलांशी अश्लील वर्तन केल्याचं समोर आलं आहे. भाईंदर पोलीस ठाण्यात आज एका एनजीओत काम करत असलेल्या महिलेने भाविद कलम 354 अ आणि 354 ड अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या बोगस डॉक्टरला वसई पोलीसांनी अटक केली आहे.


बोगस डॉक्टर हेमंत पाटीलचे एकामागून एक भंयकर प्रताप समोर येत आहेत.  एप्रिल 2020 मध्ये त्याने कोविड काळात मिरा भाईंदर पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्रॅक्टीस केली होती. त्यावेळी त्याने एका सामाजिक कार्य करणाऱ्या अनिता दिक्षीत यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अश्लील मेसेजही करायचा. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील जवळपास 10 ते 12 स्टाफ, नर्स, डॉक्टरांशी त्याच्या खराब वर्तनाबद्दल तक्रारी आल्या.  त्यावेळी अनिता दिक्षीत यांनी बोगस डॉक्टर हेमंत पाटील विरोधात तक्रार अर्ज लिहून त्यात या सर्व महिलांच्या सह्या घेवून, भाईंदर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र  त्यावेळी तेथील पोलिसांनी त्यांना हवा तसा रिस्पॉन्स दिला नाही. तर पालिकेनेही त्यावर काही कारवाई केली नाही. आता त्या तक्रार अर्जावर  कारवाई करण्यात आली असून, अनिता दिक्षीतांच्या तक्रारीवरुन भाईंदर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल केला आहे. 


आरोपी हेमंत पाटील हा वसईत 2018 पासून अस्थिरोगाचा दवाखाना चालवत होता. यावेळी त्याने अनेक रुग्णावर उपचार ही केले. अस्थिरोगतज्ञ म्हणून त्यांने शस्त्रक्रियाही केल्या. अनेकांवर त्याने चुकीचे उपचार  केल्याचे देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आठ जणांनी हेमंत पाटील विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याचा तपास पोलीस करत आहेत. 


हेमंत पाटील विरोधात अमरावतीच्या राजपेठ पोलीस ठाण्यात त्याची पत्नी डॉ. पूनम सोनावणे हीने ही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. दहावीनंतर अवघ्या तीन वर्षातच त्याने एमबीबीएसची बोगस पदवी मिळवली. डॉक्टर झाल्यानंतरही तो एका एजन्सीत मसाला विक्री, तसेच एका कंपनीत सेल्समनचे काम करत असल्याच उघड झालं आहे.



महत्त्वाच्या बातम्या :