वसई :   मसाले विक्री करणाऱ्या बोगस अस्थिरोग तज्ञ डॉक्टरचे आता भयानक प्रकार उजेडात आले आहेत. चुकीच्या पध्दतीने ऑपरेशन केल्यामुळे वसईतील 8 रुग्णांना कायमचं बिछान्यातच बसावं लागलं आहे. त्या सर्वांनी वसई पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आला आहे.  वसईतील माया केनिया या महिलेशी बातचीत केल्यावर या डॉक्टरामुळे कशा प्रकारे  जिवंतपणी त्यांना मरणयातना सहन कराव्या लागत असल्याचं भयानक वास्तव समोर आलं आहे. 


माया केनिया, वसईच्या साई नगर येथे राहतात. या मागील दोन वर्षापासून घरातील बेडरुमच्या चार भिंतीतच यांच विश्व सामावलं आहे. त्यांची ही अवस्था केलीय मसाले विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टर हेमंत पाटील याने. देव समजून त्या आपलं  गुडगेदुखीच्या उपचारासाठी गेल्या आणि कायमचं अपंगत्त्व आलं.


माया केनिया यांना 5-6 वर्षापासून गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला होता.  मुंबईच्या नामांकित डॉक्टरांनी त्यांना 10 लाख खर्च येईल असं सांगितलं. तर वसईच्या या बोगस डॉक्टर हेमंत पाटील याने नव्या अद्ययावत टेक्नॉलजीद्वारे अवघ्या दोन लाखात ऑपरेशन करण्याची हमी दिली. बोगस डॉक्टराने माया केनियावर दिनांक 10 फेब्रुवारी 2020 रोजी ऑपरेशन केलं.  मात्र चुकीच्या ऑपरेशनमुळे त्यांचे आता दोन्ही गुडघे निकामी झाले आहेत. त्यांना आता चालता ही येत नाहीत. त्यावेळी या बोगस डॉक्टरची तक्रार त्यांच्या मुलाने केली होती.  मात्र पालिकेने त्याकडे लक्षच दिलं नाही. 


बोगस डॉक्टर हेमंत पाटीलच्या चुकीच्या उपचार पध्दतीमुळे बिछान्यात पडून असणाऱ्या या एकमेव  महिला नाहीत तर अशा आणखी  सात जणांवर ही या बोगस डॉक्टरने अशी वेळ आणली आहे.  हेमंत पाटीलवर  गुन्हा दाखल होताच आठही जणांनी वसई पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वसई पोलिसांनी माया केनियाच्या फिर्यादीवरुन बोगस डॉक्टरवर 307 कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे. 


तीन वर्ष या बोगस डॉक्टराने आपलं दुकान थाटलं होतं. हा रुग्णावर चुकीच्या पध्दतीने उपचार  करत होता. बोगस डॉक्टरांवर कारवाई करणाऱ्या पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने जर वेळीच पावले उचलली असती तर आज माया केनिया या आपल्या पायावर आपल आनंदी जीवन जगत असत्या. 


हे ही वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha