मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जारांगे पाटील (Manoj Jarange) यांना लेखी पत्र पाठवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रात अतिशय महत्वपूर्ण सूचना प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात केले. वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे या प्रकाश आंबेडकांचे पत्र घेऊन अंतरवली सराटीमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ते पत्र दिलं.
या पत्रात मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी निवडून आलेल्या आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास देखील प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलाय. राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टिकेचा आसूड ओढतांनाच जरंगे पाटील यांना हे आंदोलन पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी असं सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या पत्रानंतर आता जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी पत्रात काय म्हटलं?
प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा मराठा आरक्षाणाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. तसेच या पत्रात त्यांनी म्हटलं की, जोपर्यंत आमदार आणि खासदारांच्या घरासमोर धरणे आंदोलनं होत नाही, तोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार हा प्रश्न गांभीर्याने घेणार नाही आणि ते जागेवरुनही हलणार नाहीत. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचंही प्रकाश आंबेडकरांनी या पत्रात म्हटलं.
मराठा आमदार - खासदारांच्या घरासमोर निदर्शने करा - प्रकाश आंबेडकर
या आरक्षणाची तीव्रता वाढवण्यासाठी जे आमदार आणि खासदार निवडून गेले आहेत, त्यांच्या घरासमोर निदर्शने करावीत तरच ते जागेवरुन हालतील. त्यामुळे या आंदोलनाला योग्य वळण द्यावे अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी या पत्राद्वारे केली आहे. दरम्यान मनोज जरांंगे यांनी त्यांच्या प्रकृतिची देखील काळजी घ्यावी असं या पत्रात म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तीव्रता दिवसागणिक वाढत असल्याचं पाहायला मिळतयं. त्याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने देखील त्यांचा पाठिंबा या आंदोलनाला दिलाय. तसेच या आंदोलनामुळे मनोज जरांगे यांची प्रकृति ढासळत चाललीये. त्यामुळे त्यांच्या प्रकृतिची काळजी घेण्याचं आवाहन त्यांना संपूर्ण राज्यभरातून केली जातेय.