'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमचं सेम असतं' हे जरी मंगेश पाडगावकर म्हणत असले तरी सिया आणि महेशचा प्रेम जरा हटके आहे. सिया नववी मध्ये शिकत असताना कौटूंबिक भांडणात तिचा चेहरा आणि शरीराचा भाग जळाला आणि बर्न विक्टिम झालेली सिया काही वर्ष डिप्रेशनमध्ये गेली. मात्र, आयुष्यात हार न मानता तिने पुढे पदवी शिक्षण पूर्ण करत आता ती निराधार महिलांसाठी कार्य करते. स्वतः वर प्रेम करायला शिकलेल्या सियावर उत्तर प्रदेशच्या महेशचा प्रेम बसलं आणि थेट त्याने लग्नाची मागणी सियाला घातली.
महेश सुद्धा उत्तरप्रदेशमध्ये एनजीओमध्ये काम करतो. त्यामुळे सियाच दुःख त्याने समजून तिला आपला आधार देण्यास सुरुवात केली. इतकाच नाही तर तिच्या वेदना आपण वाटून घेऊन तिला आयुष्यभर सुखी ठेवण्याचं आणि सियाची काळजी घेण्याचं वचन महेशने सियाला दिलं आहे. लवकरच हे दोघे आता विवाहबंधनात अडकणार असून आपलं नवं आयुष्य सुरू करत आहे.
'प्रेम हे शरीर ,सौंदर्य याच्या पलीकडच आहे. हे प्रेम मनाच मनाशी जुळलेलं कोणताही स्वार्थ नसलेलं आहे', अस महेश आणि सियाच म्हणणं आहे. त्यामुळे हे प्रेम समाजासाठी एक उदाहण बनून निस्वार्थ प्रेमाची व्याख्या सांगत आहे.
Valentine Day | प्रेम कुणावर करावं... सांगणारी प्रेमयात्रा!, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपक्रम | ABP Majha
संबंधित बातम्या :
'व्हॅलेंटाईन डे' बाबतच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे लाजतात तेव्हा...