एक्स्प्लोर

शहरी नक्षलवाद प्रकरण | प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंच्या कोठडीत वाढ

शहरी नक्षलवाद प्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 25 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे विशेष कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

  मुंबई : शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या कोठडीत आठवड्याभराची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी रिमांड संपत असल्यानं तेलतुंबडे यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा कोर्टाकडे पुढील तपासाकरता तेलतुंबडेंची पोलीस कोठडी आठवड्याभरासाठी वाढवून मागण्यात आली. कोर्टानं ही विनंती मान्य करत प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना 25 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीतच ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपताच तेलतुंबडे हे गेल्या मंगळवारी मुंबईतील एनआयए मुख्यालयात तपासयंत्रणेपुढे शरण आले. त्यानंतर एनआयएनं त्यांना अटक केली होती. माओवादी तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टानं 14 फेब्रुवारी 2020 रोजी नकार दिला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अवधी मिळावा याकरता दोघांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून दिलासा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानंही या दोघांचं अपील फेटाळून लावत त्यांना 14 एप्रिलपर्यंत तपासयंत्रणेपुढे शरण होण्याचे निर्देश दिले होते. गौतम नवलखा हे दिल्लीत एनआयएपुढे शरण आले असून त्यांना तिथं अटक करण्यात आली आहे. शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे या दोघांविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेली कागदपत्रे ही तपासलेली नाहीत. तसेच पुणे पोलिसांनी अद्याप त्यांचा यासंदर्भात दोघांचा साधा जबाबदेखील नोंदवलेला नाही. मुळात याप्रकरणाशी यांचा काहीही संबंधच नाही असा युक्तिवाद दोघांच्यावतीने कोर्टात केला गेला. गौतम नवलखा हे काश्मिरमध्ये सत्य शोधन समितीच्यावतीने गेले होते. तेव्हा तिथं त्यांचा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संपर्क आला होता. मात्र हा आरोप बिनबुडाचा असून नवलखा हे सरकारच्यावतीने शांतता दूत म्हणून काम पाहत होते. त्यामुळे ते माओवाद्यांमध्ये फारसे प्रसिद्ध नव्हते असाही दावा कोर्टात करण्यात आला होता. मात्र हे दोघेही एल्गार परिषदेशी संबंधित असून भीमा-कोरेगाव प्रकरणात यांच्या सहभागाबाबतही अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्याबाबत चौकशी आणि अधिक तपास सुरू असल्य्यामुळे त्यांचा ताबा मिळवून अधिक चौकशी गरजेची असल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं. शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग या इतर आरोपींकडून जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध जोडलेली अनेक कागदपत्र जप्त केली आहेत. त्यात या सर्व आरोपींनी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध कसे ठेवले आहेत याचा उल्लेखही या कागदपत्रातून करण्यात आला असल्याचा तपासयंत्रणेचा दावा आहे. तसेच आनंद तेलतुंबडे हे प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असून अशा संस्थांमध्ये लोकांची भरती करणे आणि या संस्थांसाठी निधी गोळा करण्याचे कामही ते पाहत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

Embed widget