एक्स्प्लोर

एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली बेकायदेशीर, प्रवीण वाटेगावकरांचा आरोप

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गेली 13 वर्ष सुरु असलेली टोल वसूली ही बेकायदेशीररित्या सुरु आहे, असा खळबळजनक आरोप याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी हायकोर्टात केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा म्हैसकर प्रायव्हेट लिमिटेड, आयआरबी आणि MSRDC यांच्यात झालेला त्रिपक्षीय करार नोंदणीकृत (stamp duty registered) झालेला आहे की नाही ते प्रतिज्ञापत्राद्वारे सांगा, असे मुंबई उच्च न्यायालयानं MSRDC ला आदेश दिले आहेत.

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गेली 13 वर्ष सुरु असलेली टोल वसूली ही बेकायदेशीररित्या सुरु आहे, असा खळबळजनक आरोप याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी हायकोर्टात केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा म्हैसकर प्रायव्हेट लिमिटेड, आयआरबी आणि MSRDC यांच्यात झालेला त्रिपक्षीय करार नोंदणीकृत (stamp duty registered) झालेला आहे की नाही ते प्रतिज्ञापत्राद्वारे सांगा, असे मुंबई उच्च न्यायालयानं MSRDC ला आदेश दिले आहेत. त्रिपक्षीय करार नोंदणीकृत झाला नसल्यानं चुकीच्या पद्धतीनं टोलवसुली सुरु असल्याचा याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांचा आरोप, नोंदणीकृत कराराच्या अभावी राज्याच्या महसुलाचं नुकसान झालं असल्याचा वाटेगावकर यांचा दावा आहे. तर राज्य सरकारनं या याचिकेच्या आधारे चौकशी सुरू झाल्याचं कोर्टात सांगितलं आहे. यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी उच्च मुंबई न्यायालयात दाखल केली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या रस्त्याच्या उभारणीचा पूर्ण खर्च हा अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झाल्यामुळे ही टोलवसूली तात्काळ बंद करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय की, याबाबतचा करार हा कंत्राटदारासोबत करण्यात आला आहे. ज्यात साल 2019 पर्यंत टोल वसूलीची मुदत देण्यात आलीय. तसेच खर्च पूर्ण झाला तरी टोल वसूलीमधेच थांबवण्यात यावी अशा प्रकारचा कोणताही मुद्दा करारात समाविष्ट नसल्याचं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं आहे. एक्सप्रेस वेच्या बांधकामाची पूर्ण किंमत वसूल होऊनही कंत्राटदाराकडून 2019 पर्यंत टोलवसूली सुरु ठेवण्यास या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. राज्यातील छोटे टोल बंद करुन राज्य सरकार बड्या कंत्राटदारांना पाठिशी घालत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Commonwealth Games 2026 : हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय
हातातली बॅट सुटली, बापाचं छत्र हरपलं... पण पठ्ठ्याने इतिहास रचला! डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तेजस्विन शंकर ठरला पहिला भारतीय
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
माझी निवड झाली नाही, तू तरी...; 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवले; भावाला लिहिलेलं पत्र वाचून डोळे पाणावतील
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Embed widget