एक्स्प्लोर

ओशोंच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतात आणण्याच्या हालचालींना वेग

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपासाचा प्रगती अहवाल बुधवारी हायकोर्टात सादर केला.

मुंबई: आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपासाचा प्रगती अहवाल बुधवारी हायकोर्टात सादर केला. केंद्रातील पराराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीनं तपासयंत्रणा स्पेन कोर्टातून ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतीय कोर्टात सादर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. त्यामुळे हायकोर्टानं 29 जूनपर्यंत या खटल्याची सुनावणी तहकूब केली आहे. पुढील सुनावणीस तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देशही कोर्टानं दिले. न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. खोटं मृत्यूपत्र बनवून ट्रस्टींनी मालमत्ता हडपल्याचा आरोप ओशो अनुयायांचा आहे याचिकाकर्ते योगेश ठक्कर यांनी याप्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखी खाली व्हावा अशी मागणी हायकोर्टात केली. ओशो रजनीश यांचं खोटं मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप ओशोंचे निकटवर्तीय आणि याचिकाकर्ता योगेश ठक्कर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या प्रकरणी तक्रार करुन 4 वर्ष उलटून गेली तरी पुणे पोलिसांना या केसमध्ये कोणतंही यश मिळालेलं नाही. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्देशांनंतर हा तपास ईओडब्ल्यूकडे सोपवण्यात आला आहे. हायकोर्टाला दिलेल्या माहितीनुसार सध्या उपलब्ध असलेल्या मृत्यूपत्राच्या झेरॉक्सवरून त्याची सत्यता तपासण्यात असमर्थ असल्याचं हँडराइटिंग एक्सपर्टनं कळवलं आहे. त्यामुळे परदेशातील स्पेनच्या कोर्टात यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यातील मूळ कागदपत्रे आणि मृत्यूपत्राची प्रत मागविण्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रयत्न सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

BMC Officer Bribe Case : शौचालयाचे बिल मंजूर करण्यासाठी 3.50 लाखांची लाच? गोवंडीतील खळबळजनक प्रकार; बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा
शौचालयाचे बिल मंजूर करण्यासाठी 3.50 लाखांची लाच? गोवंडीतील खळबळजनक प्रकार; बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
धक्कादायक! वर्सोवा समुद्रकिनारी आढळला पोत्यात बांधलेला तरुणाचा मृतदेह, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय
धक्कादायक! वर्सोवा समुद्रकिनारी आढळला पोत्यात बांधलेला तरुणाचा मृतदेह, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Embed widget