एक्स्प्लोर

मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार मांत्रिकांची मदत घेणार 

राज्यातील मेळघाट व अन्य आदिवासी भागातील कुपोषणासह विविध समस्यांविषयी मुंबई उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.

मुंबई : मेळघाटातील कुपोषणाशी सामना करण्यासाठी आता राज्य सरकार मांत्रिकांचीही मदत घेणार आहे, अशी कबूली स्वत: राज्य सरकारनं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी तसेच रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारकडून मेळघाटात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

मेळघाटातील आदिवासी मात्र आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत असून आजार झाल्यास मांत्रिकांकडे धाव घेतात त्यामुळे रुग्णांना दवाखान्यात घेऊन येण्यासाठी सरकारही या मांत्रिकांचीच मदत घेणार असून मोबदला म्हणून एका रुग्णामागे प्रत्येकी 200 रुपये मांत्रिकाला देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

राज्यातील मेळघाट व अन्य आदिवासी भागातील कुपोषणासह विविध समस्यांविषयी मुंबई उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. त्यावेळी न्यायालयात राज्यसरकारची बाजू मांडताना आशुतोष कुंभकोणी यांनी कोर्टाला सांगितले की बालमृत्यू रोखण्यासाठी मेळघाटात मेडिकल मोबाईल व्हॅन तसेच अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

याशिवाय डॉक्टरांचे पथकही याठिकाणी सतत भेटी देत आहेत. परंतू ग्रामीण भागातील आदीवासी मात्र आजार झाल्यास आजही मांत्रिकाकडेच धाव घेतात. त्यामुळे या मांत्रिकांवरच रुग्णांना दवाखान्यात पाठवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यासाठी मोबदला म्हणून या मांत्रिकाला 200 रुपये प्रत्येकी एका रुग्णामागे मोजण्याची योजना असल्याचं राज्यसरकारच्यावतीने हायकोर्टाला सांगण्यात आले.

हायकोर्टाने राज्य सरकारचा हा युक्तीवाद ऐकून घेतला परंतू सुनावणीवेळी याचिकाकर्ते बंडू साने उपस्थित नसल्याने उच्च न्यायालय याप्रकरणावरील सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Sanjay Shirsat VIDEO : राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 
राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Embed widget