एक्स्प्लोर

मुंबईतील भाजप नगरसेवकाला 24 लाखांचा भुर्दंड, बीएमसीच्या इतिहासात मोठी कारवाई

अंधेरीतील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी अखेरीस घडलेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत आपला बिनशर्त माफीनामाही सादर केला तसेच यापुढे एकही बेकायदेशीर होर्डिंग लावणार नाही अशी लेखी हमीही हायकोर्टात दिली आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील एक मोठी घटना घडली आहे. आपल्याच वॉर्डात बेकायदेशीर होर्डिंग लावल्याबद्दल खुद्द नगरसेवकालाच 24 लाखांचा भुर्दंड पडला आहे. ही संपूर्ण रक्कम पालिका आयुक्तांना झालेल्या घटनेची नुकसानभरपाई म्हणून पालिकेच्या तिजोरीत येत्या दोन महिन्यांत जमा करावी लागणार आहे.
अंधेरीतील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी अखेरीस घडलेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत आपला बिनशर्त माफीनामाही सादर केला तसेच यापुढे एकही बेकायदेशीर होर्डिंग लावणार नाही, अशी लेखी हमीही हायकोर्टात दिली आहे. कारवाईसाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना केलेली मारहाण या नगरसेवकाला खूप महागात पडली आहे.
इतकंच नव्हे तर आठवड्यातला एक दिवस आपल्याच वॉर्डात फिरून शाळा, मैदानं, हॉस्पिटल इत्यादी परिसरात फिरून बेकायदेशीर होर्डिंग शोधून त्याची रितसर तक्रारही पटेल यांनाच करावी लागणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी पालिकेला केलेली नुकसानभरपाई आणि बेकायदेशीर होर्डिंगच्या किती तक्रारी केल्या याची माहितीही द्यावी लागणार आहे.
राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंगविरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती संकलेचा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. ज्यात मुरजी पटेल यांच्याबद्दलचं हे प्रकरण समोर येताच हायकोर्टानं त्यांना कोर्टाच्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल नोटीस बजावली होती.
काय आहे प्रकरण
भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल आणि केसरबेन मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे अंधेरीतील पालिका मैदानाबाहेर व फुटपाथवर बेकायदा होर्डिंग आणि बॅनर लावल्याची तक्रार पालिकेच्या वेबसाईटमार्फत मिळाली होती. त्यानुसार, खातरजमा केल्यानंतर के वॉर्डातील लायसन्स इन्स्पेक्टर उत्तम सरवदे हे आपल्या सहकाऱ्यांसह कारवाईस गेले.
पालिका अधिकारी हे होर्डिंग्ज काढत असताना पटेल यांचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते राजू सरोज, सुनील चिले, रोशन शेख, नरेश शेलार, महेश शिंदे, प्रकाश मुसळे, विशाल निचिते यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळ करत पालिका कर्मचाऱ्यांना मारहाणही केली’, असे महापालिकेने अवमान याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले. तसेच यासंदर्भातील फोटोही पुरावा म्हणून दाखल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Embed widget