एक्स्प्लोर

बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी लोकप्रतिनिधींची उमेदवारीच रद्द झाल्यास समाजात योग्य संदेश जाईल : हायकोर्ट

बेकायदा बॅनरविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं धारेवर धरलं. घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी घेत माफी मागा आणि पालिका अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीबद्दल पालिकेकडे नुकसानभरपाई देऊन हे प्रकरण संपवा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले.

मुंबई : बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी उमेदवाराची थेट उमेदवारीच रद्द झाल्यास समाजात योग्य तो संदेश जाईल. जर एखाद्या राजकीय पक्षांनी तशी स्वत:हून तजवीज केल्यास आम्ही त्या निर्णयाचं मनापासून स्वागत करू, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत.

राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंगविरोधात सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.

सोमवारच्या सुनवणीत हायकोर्टानं भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांचा खरपूस समचार घेतला. बेकायदा बॅनरविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं धारेवर धरलं. घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी घेत माफी मागा आणि पालिका अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीबद्दल पालिकेकडे नुकसानभरपाई देऊन हे प्रकरण संपवा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले.

आपल्या कार्यकर्त्यांसह न्यायालयात दाखल झालेल्या मुरजी पटेल यांनी नुकसानभरपाई देण्याचं मान्य केलं. मात्र बेकायदेशीर होर्डिंग लावल्याचं कबूल करण्याबाबत मौन बाळगलं. यावर हायकोर्टानं जाब विचारल्यानंतर हायकोर्टात जर ही बाब कबूल केली, तर उद्या आपलं राजकीय भविष्यच धोक्यात येईल. तसेच या संदर्भात पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला असल्यानं अशाप्रकारे हायकोर्टात त्यावर थेट सुनावणी होऊ शकत नाही, असं याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं.

महापालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमानाची कारवाई का करु नये? अशी नोटीस उच्च न्यायालयाने नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना बजावली आहे. एवढेच नव्हे तर याप्रकरणी आपली भूमिका 12 मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल व केसरबेन मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे अंधेरीतील पालिका मैदानाबाहेर व फुटपाथवर बेकायदा होर्डिंग व बॅनर लावल्याची तक्रार पालिकेच्या वेबसाईटमार्फत मिळाली होती. त्यानुसार, खातरजमा केल्यानंतर के वॉर्डातील लायसन्स इन्स्पेक्टर उत्तम सरवदे हे आपल्या सहकाऱ्यांसह कारवाईस गेले होते.

महापालिका अधिकारी हे होर्डिंग्स काढत असताना पटेल यांचे समर्थक व भाजपचे कार्यकर्ते राजू सरोज, सुनील चिले, रोशन शेख, नरेश शेलार, महेश शिंदे, प्रकाश मुसळे, विशाल निचिते यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळ करत पालिका कर्मचाऱ्यांना मारहाणही केली’, असे महापालिकेने अवमान याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले. तसेच यासंदर्भातील फोटोही पुरावा म्हणून दाखल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
Shivsena Eknath Shinde Dasara Melava 2026: मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण बांधा; शिवसेनेचे दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिकांना आवाहन
मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण बांधा; शिवसेनेचे दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिकांना आवाहन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RSS Vijayadashami 2026: 'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
'वंदे मातरम्'सह मंचावर 'खास' संदेश, पारंपरिक शस्त्रांसह भारतीय बनावटीचं अस्मि अत्याधुनिक कार्बाइन; स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचं यंदाचं वैशिष्ट्य काय?
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Embed widget