एक्स्प्लोर

'शिट्टी' परत मिळवण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रयत्न, निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा हायकोर्टाचा सल्ला

बळीराम जाधव हे याच चिन्हावर साल 2009 मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते, तर साल 2014 मध्ये त्यांचा चिंतामण वनगा यांच्याकडून पराभव झाला होता. त्यावेळी त्यांचं चिन्ह 'शिट्टी' हेच होतं.

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. निवडणूक आयोगानं काढून घेतलेली 'शिट्टी' परत मिळवण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मतदान आता अवघ्या काही दिवसांवर आल्यानं याप्रकरणी आता कोर्टात दाद मागण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचं ठरवल्याचं याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफाळकर यांनी उच्च न्यायालयाला सांगितलं. याची नोंद घेत मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठानं ही याचिका गुरुवारी निकाली काढली. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत 'शिट्टी' हे चिन्ह 'बहुजन महा पार्टी' ला देण्यात आलं आहे. पालघर मतदारसंघातून लढणाऱ्या बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे उमेदवार बळीराम जाधव यांनी आपल्या याचिकेत दावा केला की, साल 2008 मध्ये राज्य निवडणूक आयोगानं या पक्षाला लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, नगरपरिषद, पालिका, ग्रामपंचायत अशा विविध निवडणुकांसाठी 'शिट्टी' हे निवडणूक चिन्ह दिलेलं आहे. बळीराम जाधव हे याच चिन्हावर साल 2009 मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते, तर साल 2014 मध्ये त्यांचा चिंतामण वनगा यांच्याकडून पराभव झाला होता. त्यावेळी त्यांचं चिन्ह 'शिट्टी' हेच होतं. त्यामुळे शिट्टी हे चिन्ह पक्षाची ओळख बनली आहे. या भागात आदिवासी पाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तेथील लोक 'शिट्टी' याच निशाणीमुळे आम्हाला ओळखतात. त्यामुळे हे विरोधकांनी आमच्याविरोधात रचलेलं राजकीय षडयंत्र आहे, असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे. मात्र हे मुक्त चिन्ह असल्यानं ते कुणालाही कायमस्वरुपी दिलेलं नाही. तरीही याप्रकरणी आम्ही लक्ष घालू, असं आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगानं उच्च न्यायालयात दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Embed widget