एक्स्प्लोर

उल्हासनगरमध्ये डॉक्टरांची हेल्मेट घालून रुग्ण तपासणी

उल्हासनगर : डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ उल्हासनगरमध्ये सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अनोखं आंदोलन केलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना तपासताना हेल्मेट घालून काम करत निषेध व्यक्त केला. बुधवारी ठाणे सिव्हील रुग्णालयात रुग्णासोबत असलेल्या तरुणाच्या टोळक्याकडून डॉक्टरांना मारहाण झाली होती. या घटनेसोबतच राज्यभरात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व्यक्त केला. डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्यासाठी उपयोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, ठाणे सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. बुधवारी सिव्हील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण झाली होती. तसंच हॉस्पिटलची तोडफोडही करण्यात आली होती. या प्रकरणी 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासनानं त्यांना सुरक्षा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला. काय आहे प्रकरण? ठाण्यातील महागिरी येथे मारहाणीत एका तरुणावर चॉपरने हल्ला झाल्याने त्याला उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेथे कोणीही वरिष्ठ डॉक्टर नसल्याने शिकाऊ डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. शिकाऊ डॉक्टरही उपचारात दिरंगाई करत असल्याचं सांगत रुग्णासोबत आलेल्या तरुणांच्या टोळक्यांनी तेथील डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. त्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget