एक्स्प्लोर

उल्हासनगरमध्ये बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुलावरुन श्रेयवाद, खेळाडूंचं मरण

उल्हासनगर महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेने 6 जानेवारी रोजी या क्रीडासंकुलाचं खासदारांच्या हस्ते उद्घाटन केलं. मात्र हा कार्यक्रम शासकीय नसल्याचं सांगत सत्ताधारी भाजपने तो अवैध ठरवला.

उल्हासनगर : उल्हासनगरचं बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुल सध्या खेळाडूंच्या प्रतीक्षेत आहे. याला कारण ठरलंय शिवसेना आणि भाजपामधला श्रेयवादाचा वाद. शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच या क्रीडासंकुलाचं उद्घाटन केलं असलं, तरी तो कार्यक्रम अवैध असल्याचं सांगत पुन्हा उद्घाटन करण्याची घोषणा भाजपने केली आहे. मात्र तोपर्यंत या मैदानात खेळाडूंना नो एन्ट्री करण्यात आली आहे. उल्हासनगर महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेने 6 जानेवारी रोजी या क्रीडासंकुलाचं खासदारांच्या हस्ते उद्घाटन केलं. मात्र हा कार्यक्रम शासकीय नसल्याचं सांगत सत्ताधारी भाजपने तो अवैध ठरवला. तसंच भाजपच्या एखाद्या मंत्र्यांना बोलावून पुन्हा एकदा उद्घाटन करण्यात येईल, असं जाहीर केलं. इतकंच नव्हे, तर महापालिका आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवत नव्याने उद्घाटन होईपर्यंत या मैदानात खेळाडूंना खेळण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे खेळाडूंनी खेळायचं कुठे? असं प्रश्न उपस्थित झाला आहे. श्रेयवादाच्या लढाईत भाजपनं पुन्हा एकदा उद्घाटनाचा घाट घातला असला, तरी उद्घाटनाला कोणते मंत्री येणार? आणि त्यांची तारीख कोणती घ्यायची? हेदेखील भाजपचं अद्याप ठरलेलं नाही. त्यामुळे भाजपा राजकारणाच्या नादात खेळाडूंचं नुकसान करत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याबाबत भाजपचे जिल्हा अध्यक्ष कुमार आयलानी यांना विचारलं असता, लवकरच उद्घाटन होईल आणि खेळाडूंना मैदान उपलब्ध होईल, असं मोघम उत्तर त्यांनी दिलं. भाजपच्या या खेळाडूंना मार्क ठरणाऱ्या भूमिकेवर मनसे मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे. तुम्हाला काय राजकारण करायचं असेल ते करा, मात्र त्याचा खेळाडूंना फटका बसू देऊ नका, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. शिवसेना यावर गप्प बसल्याबाबतही मनसेने संताप व्यक्त केला असून येत्या दोन दिवसात जर मैदान खेळाडूंना खुलं झालं नाही, तर 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मनसे याच मैदानात क्रिकेटचे सामने भरवेल, असा इशारा मनसेने दिला आहे. या सगळ्या प्रकरणात आता भाजपचे आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते लक्ष घालतील का? आणि खेळाडूंना मैदान खुलं होईल का? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
BMC OC Abhay Scheme : मोठी बातमी: भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना दिलासा, OC अभय योजनेला मंजुरी; सर्वसामान्यांना काय फायदा?
मोठी बातमी: भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना दिलासा, OC अभय योजनेला मंजुरी; सर्वसामान्यांना काय फायदा?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Embed widget