एक्स्प्लोर
महिलांना मंदिर, मशीद, दर्ग्यात जाण्यापासून कुणीही अडवू नये : उद्धव ठाकरे

नाशिक : फक्त हिंदू धर्मातीलच नव्हे तर प्रत्येक धर्मातील महिलेला मंदिर, मशीद, दर्ग्यात जाण्यापासून कोणीही अडवू नये आणि हीच शिवसेनेची अधिकृत भूमिका असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तृप्ती देसाईंच्या दर्गा प्रवेशाला विरोध करणारे हाजी अराफत यांनी व्यक्त केलेलं मत त्यांचं वैयक्तिक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवाय, हाजी अराफत यांना धर्माचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त ते नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिलांच्या मंदिर प्रवेशावरील शिवसेनेची अधिकृत भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















