मुंबई : उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभा मतदारसंघाची ( Mumbai North West Loksabha) जागा सोडण्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट नकार दिलाय. काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर पश्चिम मुंबई  लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली होती. पण ही मागणी उद्धव ठाकरेंनी फेटाळली असल्याची बातमी समोर येतेय. नाना पाटोले (Nana Patole), अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील उद्धव ठाकरे यांना ही जागा सोडण्यासाठी गळ घातली होती. पण आता उद्धव ठाकरेंनी जागा सोडण्यास नकार दिल्याचं समोर आलंय. 


उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ हा खासदार गजानन किर्तीकर यांच्याकडे आहे. गजानन किर्तीकरांनी तत्कालीन शिवसेनेतून ही जागा लढवली होती. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंच्या हातून हा मतदारसंघ निसटला. पण 2024 च्या लोकसभा निवडणूकांसाठी ठाकरे गटाकडून 23 जागांवर दावा करण्यात आलाय. त्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच गजानन किर्तीकर यांच्या जागेचा देखील समावेश आहे. 


काँग्रेसचा याच जागेसाठी आग्रह


दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांकडून संजय निरुपम यांच्यासाठी या जागेची मागणी होत होती. त्यासाठी काँग्रेसचे नेते  नाना पाटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना गळ घातल्याची माहिती समोर आली होती. पण या सगळ्या गोष्टी बाजूला सारत उत्तर पश्चिम हा मतदारसंघ आपल्याकडेच राहणार असल्याची स्पष्टोक्ती उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलीये. त्यामुळे पुन्हा एकदा मविआमध्ये जागावाटपावरुन वादाची ठिणगी पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


उद्धव ठाकरेंच्या 23 जागांची मागणी फेटाळली 


आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 23 जागांची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावली होती.  मागील लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेने खूप जागा जिंकल्या होत्या, पण त्यांचे अनेक उमेदवार एकथान शिंदे यांच्या ताफ्यात आहेत.शिवसेनेने मागणी केलेल्या 23 लोकसभा जागा, काँग्रेस पक्षाने नाकारल्या आहेत. काँग्रेस नेत्यांच्या मते, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झालंय. त्यांच्याकडून अनेक नेत सत्तेत गेलेत.  त्यामुळे काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष आहे. हाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते  अशोक चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीमधील पक्षामध्ये एकी असणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हव्यात. पण सध्याच्या परिस्थितीमद्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची 23 जागांची मागणी खूप जास्त होतेय. 


हेही वाचा : 


जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसचे राज्यातील नेते सहभागी होणार नाहीत, काँग्रेस हायकमांड, उद्धव ठाकरे आणि शरद पवारच सगळं ठरवणार