एक्स्प्लोर
'त्या' दलालांचा बंदोबस्त शिवसेना करेल : उद्धव ठाकरे

मुंबई : मोठ्या प्रयत्नानंतर गिरणी कामगारांना मिळालेल्या हक्कांच्या घऱांवर दलालांचा डोळा आहे, असा आरोप आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. वरळीत आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळी ते बोलत होते.
"पुन्हा एकदा मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव दलालांकडून आखला जात आहे. ज्या गिरणी कामगारांना म्हाडा किंवा इतर माध्यमातून मुंबईत घरं मिळाली, त्या कामगारांच्या मागे दलालांनी तगादा लावला आहे. कामगारांची इच्छा नसतानाही घर विकण्याचा आग्रह धरला जात आहे. मात्र गिरणी कामगारांनी दलालांना बळी पडू नये. या दलालांचा बंदोबस्त शिवसेना आपल्या पद्धतीनं करेल", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेही उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
