एक्स्प्लोर

अमित ठाकरेंच्या साखरपुड्याला उद्धवकाका अनुपस्थित!

अमित ठाकरेंच्या साखरपुड्यासारख्या आनंदाच्या आणि वैयक्तिक सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला असेल, अशी अटकळ बांधली गेली.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा साखरपुडा आज मुंबईत पार पडला. मात्र या सोहळ्याला अमितचे काका, म्हणजे राज यांचे चुलत बंधू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. उद्धव ठाकरे यांना अमित यांच्या साखरपुड्याचं निमंत्रणच दिलं नसल्याची माहिती आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2006 मध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर दोघा भावंडांमध्ये वितुष्ट आलं. गेल्या 11 वर्षांमध्ये ठाकरे बंधू फारसे समोरासमोर आलेले नाहीत. दोघं पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा अनेक वेळा झाल्या, मात्र ते प्रत्यक्षात उतरलं नाही. महापालिका निवडणुकांपूर्वी राज यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यास दिलेला प्रस्तावही धुडकावण्यात आला. त्यानंतर दोघांचे संबंध पुन्हा ताणले गेले. नाही म्हणायला, उद्धव ठाकरे यांचं प्रकृती अस्वास्थ्य, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन, यासारख्या काही मोजक्या कौटुंबिक क्षणांना दोघं भाऊ एकत्र आले. त्यामुळे अमित ठाकरेंच्या साखरपुड्यासारख्या आनंदाच्या आणि वैयक्तिक सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला असेल, अशी अटकळ बांधली गेली. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणीही साखरपुड्याला हजर नव्हतं. आता, अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण उद्धव यांना दिलं जाणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न

अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होत आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून दोघांचा साखरपुडा आयोजित करण्यात आला.

कोण आहे मिताली बोरुडे?

मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

अमित ठाकरे राजकारणापासून अलिप्त

अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते फार सक्रीय नाहीत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता. अमित ठाकरेंनी मुंबईतील पोद्दार कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget