एक्स्प्लोर

‘निवडणुकीच्या तयारीला लागा’, उद्धव ठाकरेंचे शिवसेना आमदारांना आदेश

मुंबई: ‘उत्तर प्रदेशमध्ये योगी आणि राज्यात निरुपयोगी सरकार आहे.’ अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (बुधवार) केली होती. त्यानंतर आज आमदारांच्या बैठकीत त्यांनी ‘निवडणुकीच्या तयारीला लागा.’ असे आदेश दिले आहेत. मुंबईमध्ये आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. जीएसटीसाठी येत्या 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. जीएसटीच्या मुद्द्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. मात्र, महापालिकेची स्वायत्ता अबाधित राहावी अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.  भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान: भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेनं पुन्हा एकदा तयारी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर प्रश्नांसाठी आता शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. संघर्षयात्रा आणि संवाद यात्रेपाठोपाठ आता शिवसेना शिवसंपर्क अभियान राबवणार आहे. हे अभियान मराठवाड्यापासून सुरु होणार आहे. त्यानंतर विदर्भ, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, कोकण इथंही हे अभियान राबवलं जाणार आहे. ‘...तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल’ दरम्यान, जीएसटी संदर्भात शिवसेनेने आपली भूमिका नेहमी स्पष्ट केली आहे. ‘जर लाचार होऊन महापालिकेला राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल. सुरूवातीपासून आमची हिच मागणी आहे की महापालिका ही अबाधित राहिली पाहिजे. भिकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारी उभं रहावं लागणार असेल, तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल.’ असा इशाराही उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. संबंधित बातम्या: यूपीत योगी सरकार, महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार : उद्धव ठाकरे पाकड्यांशी 'मन की नाही तर गन की बात' करा : उद्धव ठाकरे राजू शेट्टी 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा '..म्हणून मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपतीसाठी सुचवलं'

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Tiranga Morcha: 'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget