एक्स्प्लोर

...तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या- उद्धव ठाकरे

जिओच्या सेट टॉप बॉक्समुळे अनेक केबल चालकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केबल चालकांना मार्गदर्शन केलं.

मुंबई : केबल फुकट द्यायचे असेल तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जिओच्या नव्या सेट टॉप बॉक्सवरून रिलायन्सवर टीका केली. रिलायन्स जिओने सुरु केलेल्या नव्या सेट टॉप बॉक्सच्या घोषणेवरून केबल चालकाच्या व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची चिन्ह आहे. रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात सर्वात वेगानं संपूर्ण भारतात नेटवर्क पसरवलं. जिओनं आता सेट टॉप बॉक्स बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र व्यवसाय बंद पडण्याच्या भीतीनं सर्वच केबल चालकांनी जिओच्या सेट टॉप बॉक्सला विरोध केला आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केबल चालकांना मार्गदर्शन केलं. "जिओच्या नवीन सेट टॉप बॉक्समुळे केबल व्यावसायिकांच्या रोजगाराला फटका बसत आहे. सुरुवातीला सेवा फुकट देऊन नंतर त्यावर चार्जेस आकारले जातात, ही फसवणूक आहे. जर तुम्हाला केबल फुकट द्यायचे असेल तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या", असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. देशात सध्या सगळीकडे डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. मात्र रोजी रोटी डाउनलोड करता येत नाही. घरात रोजी रोटी नाही आणि डिजिटल इंडियाचा नारा कसला देताय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजप सरकारला विचारला. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. "मी केबल ऑपरेटर्सना बळ द्यायला आलो आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने सरकारनेही डिजिटल इंडिया सुरु केलं आहे. या डिजिटल इंडियात इंटरनेट फुकट मिळत आहे, त्यामुळे केबलही फुकट देण्याच्या घोषणा होत आहेत", असं उद्धव ठाकरे म्हणाले. गेली अनेक वर्ष राबून केबल चालकांनी हा व्यवसाय उभा केला आहे, त्यामुळे तुमचा व्यवसाय मी जाऊ देणार नाही. शिवसेना केबल चालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
CJP Protest Delhi LIVE Updates: अभिजीत दिपकेंचं विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच, फुल्ल हायव्होल्टेज ड्रामा, महिला पोलिसांनी विमानात घुसून ताब्यात घेतलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
Abhijeet Dipke CJP Ajinkya Shinde: दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!
दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!
Embed widget