एक्स्प्लोर
राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे उद्धव ठाकरेंचे संकेत
मुंबई : "भाजपसोबत मतभेदांबरोबरच टोकाचे मनभेद झाले आहेत," असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
शेर को किसी की जरुरत नहीं, हार्दिकची शिवसेनेला साथ
मुंबईत आज पाटीदार आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेल आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबई महानगरपालिकेत युती तुटल्यानंतर आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही त्यांना आपलं मानल्यानंतर पलिकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो. विधानसभेत त्यांनी युती तोडली. आता महापालिकेत आम्ही युती तोडली. एखाद्या गोष्टीत मनच रमत नसेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणून या राजकारणाला पूर्णविराम द्यायची आवश्यकता आहे."
मोदी नव्हे, आधी फडणवीसशी निपटा, मुख्यमंत्र्यांचं सेनेला आव्हान
दुसरीकडे, "पाच वर्ष माझ्या सरकारला कोणताही धोका नाही," असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement