एक्स्प्लोर

चित्रनगरीत चित्रीकरण सुरु होऊ शकते का? याची चाचपणी करणार : मुख्यमंत्री

सावधानता बाळगून निर्मितीविषयक कामेही सुरु करण्याचा विचार आहे. चित्रनगरीत चित्रीकरण सुरु होऊ शकते का याची चाचपणी करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांची इंडियन ब्रॉडकास्टर्स समवेत आज बैठक झाली.

मुंबई : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून विविध चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि अन्य लोकांवर बरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून मुंबईत चित्रनगरीत चित्रीकरण सुरु होऊ शकते का? याची चाचपणी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य सचिवांना सांगितले आहे. आज इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा केली.

यावेळी रेड झोन्स मधील शहरे वगळून इतरत्र चित्रीकरण स्थळे उपलब्ध होतील का तसेच चित्रीकरणाबाबत आराखडा लगेच सादर केल्यास शासन त्यावर निर्णय घेईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. या कॉन्फरन्समध्ये फाऊंडेशनचे अध्यक्ष एन पी सिंग, संचालक पुनीत गोयंका, जे डी मजिठीया, नितीन वैद्य, एकता कपूर, पुनीत मिश्रा, राहुल जोशी, आदेश बांदेकर, अभिषेक रेगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. संजय मुखर्जी सहभागी झाले होते.

BLOG | टू डू ऑर नॉट टू डू! 

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असले तरी चिंतेचे कारण नाही. शासन पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. वेळेवर लॉकडाऊन केल्यामुळे व पुरेशी काळजी घेतल्याने आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या आटोक्यात आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या आणि त्यावरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्री घराघरात पोहचली आहे. या लॉकडाऊनमुळे त्यांना फटका बसला आहे. परंतु, सर्व काही थांबून राहावे या मताचा मी नाही. आपण यापूर्वीच रेड झोन वगळून इतरत्र मर्यादित प्रमाणात का होईना व्यवहार सुरु केले आहे. आता आपण झोनपेक्षा कंटेनमेंट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांचीही व्याप्ती कमी केली आहे.

राज्य सरकार कलाकारांच्या पाठीशी

आपण कालच मराठी निर्माते, कलाकार यांच्यासमवेत विस्तृत चर्चा केली असून त्यांच्याही मागणीप्रमाणे पोस्ट प्रॉडक्शनची कामे किंवा शहरांबाहेर मर्यादित प्रमाणात चित्रीकरण करता येईल का याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनने सध्याच्या परिस्थितीत चित्रिकरणाबाबत आपण सावधानता बाळगून काय करू शकतो याचा आराखडा द्यावा, तो सांस्कृतिक कार्य विभागाकडून तपासून त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. टीव्ही उद्योग हा मनोरंजन क्षेत्राचा फार मोठा भाग असून अनेकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. हा उद्योग इथे स्थिरावला आहे आणि तो राज्यातच अधिक मजबूत व्हावा म्हणून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Liquor Sell Mumbai | कंटेन्मेंट झोन वगळता संपूर्ण मुंबईत घरपोच दारू मिळणार,महापालिकेचं परिपत्रक जारी

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Amravati : महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
Nanded Accident News: पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
Vaibhav Sooryavanshi : रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
Embed widget