एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारला; संजय राऊतांची एबीपी माझाला माहिती

बैठकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टेबल वाजवून निर्णयाचं स्वागत केलं. दरम्यान बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत ठोस निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करत सेना नेत्यांनी काही काळासाठी उत्सुकता ताणली. मात्र अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह स्वीकारला असल्याचे राऊत यांनी सांगितले.

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. राऊत यांच्या या माहितीनंतर महाराष्ट्रात 'ठाकरे' सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मुख्यमंत्रिपदाचा आग्रह म्हणा किंवा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची माहिती संजय राऊतांनी एबीपी माझाला दिली आहे. मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टेबल वाजवून निर्णयाचं स्वागत केलं. दरम्यान बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत ठोस निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करत सेना नेत्यांनी काही काळासाठी उत्सुकता ताणली. मात्र अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह स्वीकारला असल्याचे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेसाठी वेगाने हालचाली होऊ लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ ने त्यांची वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्रात महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. ही बैठक अद्याप सुरु आहे. परंतु काही महत्त्वाच्या कामानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बाहेर पडले. नेहरु केंद्राबाहेर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, अशी माहिती मिळत आहे. तेसच महाविकासआघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला. मुख्यमंत्री हा महाविकासआघाडीमधील सर्व पक्षांच्या आमदारांचे, गटनेत्यांचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना असे वाटते की, उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे. महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री, तसेच आतापर्यंत अनेकवेळा कॅबिनेट मंत्रीपदं भूषवलेले नेते असणार आहेत. त्यामुळे अशा नेत्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सर्वसंमती झाली आहे. दरम्यान, ठाकरे कटुंबांच्या आतापर्यंतच्या इतिहासात ठाकरे घरातील कोणत्याही व्यक्तीने कधीही मंत्रीपद भूषवलेले नाही. ठाकरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नेहमीच मंत्रीपदापासून दूर राहात आलेली आहे. परंतु ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती पहिल्यांदाच मंत्रीपदावर विराजमान होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर बेकायदेशीर संचालक नेमले नसते, गोकुळच्या मुद्यावरुन राऊतांचा थेट हल्लाबोल, लोकशाहीचा कौल पायदळी तुडवल्याची टीका
फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर बेकायदेशीर संचालक नेमले नसते, गोकुळच्या मुद्यावरुन राऊतांचा थेट हल्लाबोल, लोकशाहीचा कौल पायदळी तुडवल्याची टीका
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : 42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
ऊसाला 3500 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3500 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
Embed widget