एक्स्प्लोर

ST संपाविरोधात हायकोर्टात 2 याचिका, एकाच दिवशी सुनावणी

एकीकडे संप सुरु असताना, मुंबई हायकोर्टात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार जयंत साटम यांनी एक, तर दुसरी याचिका विनोद राठी यांनी दाखल केली आहे.

मुंबई : एससटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संपाला आता दोन दिवस पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही संप सुरुच आहे. चर्चांच्या फेऱ्याही सुरुच आहेत. मात्र त्यातून काहीच उपाय किंवा तोडगा निघताना दिसत नाही. एकीकडे संप सुरु असताना, मुंबई हायकोर्टात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार जयंत साटम यांनी एक, तर दुसरी याचिका विनोद राठी यांनी दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर एकाच दिवशी म्हणजे येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार जयंत साटम यांची याचिका ऐन दिवाळीत पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्यात आलीय. 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू असलेला हा राज्यव्यापी संप बेकायदेशीर ठरवून संपकऱ्यांना तात्काळ कामावर रूजू होण्याचे निर्देश देण्याची या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. जेष्ठ पत्रकार जयंत साटम यांनी ही जनहित याचिका दाखल केलीय. या याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. या संपाचा सर्वात मोठा फटका शहरांपासून दूर खेड्यात राहणाऱ्या जनतेला बसला आहे. जिथं एसटी शिवाय पर्याय नाही अश्या भागांत जनजीवन जवळपास ठप्प झालंय. राज्य सरकार आणि एसटी महामंडळ हा संप थांबवण्यात, तसेच नागरीकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय. त्याचबरोबर ऐन सणासुदीच्या काळात संप पुकारुन राज्यातील सर्व सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कयदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशीही मागणी या याचिकेत करण्यात आलीय. विनोद राठींची याचिका एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात विनोद राठी यांच्यावतीन आणखी एक जनहित याचिका बुधवारी हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. याही याचिकेवर शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आलीय. दरम्यान न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत यासंदर्भात राज्य सरकरने एक समिती तयार केली असून कामगार संघटनांशी त्यांची बोलणी सुरू असल्याची माहीती दिली. त्यानुसार लवकरात लवकर ही बोलणी यशस्वी करून तोडगा काढण्याचे तोंडी निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. दरम्यान संप बेकायदा ठरवून तो मोडून काढण्याच्या याचिकेतील मागणीवर कामगार संघटनेच्यावतीनं हायकोर्टात विरोध करण्यात आला. जोपर्यंत औद्योगिक कोर्ट हा संप बेकायदेशीर ठरवत नाही तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. कामगारांच्या मागण्या या रास्त असून प्रदीर्घ काळापासून यावर चर्चा सुरूय. मात्र कोणताही तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरल्यानं अखेरीस कामगारांनी संपाचं हत्यार उगारल्याचं त्यांनी कोर्टाच्या निर्दशनास आणून दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

BMC OC Abhay Scheme : मोठी बातमी: भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना दिलासा, OC अभय योजनेला मंजुरी; सर्वसामान्यांना काय फायदा?
मोठी बातमी: भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना दिलासा, OC अभय योजनेला मंजुरी; सर्वसामान्यांना काय फायदा?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget