एक्स्प्लोर
मुंबईतील मोर्चावरुन मराठा संघटनांमध्येच वेगळा सूर?

फाईल फोटो
मुंबई : मुंबईत होणारा आगामी मराठा मोर्चा हा पुढे ढकलल्याची बातमी आली आणि अवघ्या महाराष्ट्रातून उलटसुलट चर्चांना सुरु झाली. मात्र, आता मुंबईतल्या बैठकीत झालेल्या या निर्णयाला फेटाळत उर्वरित महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा 31 जानेवारीलाच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईतल्या परळमध्ये आज बैठक झाली. त्यात आगामी महापालिका, आचारसंहिता या गोष्टींचा विचार करुन मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत मुंबईतल्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले नव्हते. त्यामुळे परिस्थितीचा विचार करता हो निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. शिवाय, मोर्चा कधी काढायचा याचा निर्णय 15 जानेवारी रोजी बोलावलेल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
मराठा मोर्चात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, 31 जानेवारीला मुंबईत मराठा मोर्चा होणार म्हणजे होणारच : विनोद पाटील, मराठा संघटनांचे कार्यकर्तेपण जेव्हा ही बातमी माध्यमांमध्ये आली. तेव्हा उर्वरित राज्यातल्या नेत्यांनी मात्र हा मोर्चा नियोजित तारखेला म्हणजे 31 जानेवारीलाच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे मुंबईतल्या मोर्चाच्या तारखेवरून मराठा संघटनांमध्ये दोन वेगवेगळे सूर पहायला मिळत आहेत.
Before You Go
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















