एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हल्ला करणारे दोन फेरीवाले मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून दिले
मारहाण करणाऱ्या दोघांना मनसे कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून पकडलं. हे दोघे मालाड पोलिसांच्या ताब्यात आहेत.
मुंबई : मनसेचे मालाडमधील विभाग प्रमुख सुशांत माळवदे मारहाण प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सुशांत माळवदे यांना मारहाण करणाऱ्या दोन जणांना मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मारहाण करणाऱ्या दोघांना मनसे कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून पकडलं. हे दोघे मालाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावाने सुशांत माळवदे आणि त्यांच्या सोबतच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला.
मनसेकडून मुंबई आणि नवी मुंबईत रेल्वे स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचं काम केलं जात आहे. विविध स्टेशनांबाहेर फेरीवाल्यांना हटवण्यात आलं. मालाड स्टेशन परिसरातही फेरीवाले आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता.
संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल
विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे. काल संध्याकाळी मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे. संजय निरुपमांनी हल्लेखोर फेरीवाल्यांनी चिथावल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आज त्याची दखल घेत संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल केला.
संबंधित बातम्या :
जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर
नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा
फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?
मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड
मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement