एक्स्प्लोर

वसईत दोन चाळी कोसळल्या, दोन मुलं किरकोळ जखमी

Vasai Virar News: गेल्या चार पाच दिवसापासून वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तर अधूनमधून जोरदार पाउस ही बरसत आहे.

Vasai Virar News: गेल्या चार पाच दिवसापासून वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तर अधूनमधून जोरदार पाउस ही बरसत आहे. रविवारी सायंकाळी साढेपाच वाजण्याच्या सुमारास वसईच्या गोखिवरे येथील गौराईपाडा येथे दोन चाळी कोसळून, घरात राहणारी दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. मात्र 24 तास उलटूनही पालिकेनं या उद्ध्वस्त कुटुंबाला संक्रमण छावणीत ठेवलेलं नाही. या पावसात हे दोन कुटुंब उघड्यावर आले आहेत. विशेष म्हणजे कोर्टाने चाळी तोडण्याच्या ऑर्डर ही दिल्या आहेत, मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केलं आहे. 

दोनच दिवसापूर्वी सातीवली येथे डोंगराचा भाग कोसळलेला होता. सुदैवाने त्यात कुणीही जखमी झालं नाही. तोच रविवारी सायंकाळी साढे पाचच्या दरम्यान वसईच्या गोखिवरे येथील गौराई पाडा येथे दोन चाळीची रुम कोसळून, यात राहणारे पाठक आणि यादव कुटुंब रस्त्यावर आले आहेत. घर कोसळल्याने प्रिन्स राम आणि आर्यन यादव ही दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. सुदैवाने रात्रीच्या झोपेत घर कोसळलं नसल्याने मोठी हानी टळली आहे. परंतु  या घटनेला 24 तास उलटूनही या दोन्ही कुटुंबांना पालिकेने संक्रमण शिबिरात ठेवलेलं नाही. हे दोन्ही कुटुंब रिमझिम पावसात उघड्यावरच राहत आहेत. 

या घटनेआधी या जमिनीचे मालक कुंदन पाटील यांनी या ठिकाणी बनलेल्या चाळीबाबत पालिकेला वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका ही दाखल केली होती. न्यायालयाने ही 8 जानेवारी 2020 ला चाळी तोडण्याच्या ऑर्डर दिल्या होत्या. मात्र पालिकेने याकडे कोणतही लक्ष दिलं नसल्याचा आरोप जमिन मालकाने केला आहे. तर आम्ही कारवाई करतो, असं थातूर माथूर उत्तर पालिकेच्या उपायुक्तांनी दिलं आहे.

दरम्यान, दोन महिन्यापूर्वी राजवली येथे दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसापूर्वी सातीवली येथे दरड कोसळली होती. मात्र यात सुदैवाने कुणाचाही जीव गेला नाही. रविवारी दोन चाळ कोसळल्या, सुदैवाने जिवितहानी झाली नसली, तरी पालिकेने आता तरी अशा धोकादायक चाळी लवकरात लवकर तोडल्या पाहिजेत जेणेकरुन भविष्यात मोठी जिवीतहानी होणार नाही.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Mount Mary Fair : चोरी करण्यासाठी मुंबईत आलेल्या राजस्थानमधील जोडप्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांमुळं प्रवाशी त्रस्त; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित अजित पवार म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Embed widget