एक्स्प्लोर

अंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणारे एजंट अटकेत

राज्य महिला आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. एबीपी माझाने फरीदाची बाजू लावून धरल्यानंतर कारवाईने वेग घेतला होता.

अंबरनाथ : फरीदा खान हिला परदेशात पाठवणाऱ्या दोन एजंट्सना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. इमरान शेख आणि इकबाल शेख अशी दोन एजंट्सची नावं आहेत. राज्य महिला आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. एबीपी माझाने फरीदाची बाजू लावून धरल्यानंतर कारवाईने वेग घेतला होता. प्रकरण काय आहे? मोठ्या पगाराच्या आमिषानं हल्ली अनेकजण आखाती देशात नोकरी करण्यासाठी जातात. मात्र तिकडे गेल्यानंतर काम करताना कशाप्रकारे अनन्वित छळ केला जातो, याचं उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलं आहे. परदेशात नोकरी करणं हे हल्ली भूषण मानलं जातं. मोठा पगार आणि परदेशात राहण्याचं आकर्षण याला भुलून अनेक जण परदेशात आणि त्यातही आखाती देशात नोकरी करण्यासाठी जातात. मात्र तिकडे गेल्यानंतर कशाप्रकारे छळ केला जातो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अंबरनाथची फरीदा खान. अंबरनाथच्या बुवापाड्यात राहणाऱ्या फरीदाच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे परदेशात काही वर्ष काम करून परिस्थिती सुधारेल, या आशेनं तिनं एका एजंटच्या मदतीनं काही महिन्यांपूर्वी दुबई गाठलं. तिथून तिला ओमानमधील मस्कतला नेऊन अहमद कपिल नामक व्यक्तीच्या घरी घरकामाला ठेवण्यात आलं. मात्र 17 खोल्यांच्या अवाढव्य घराची साफसफाई, त्यातल्या 20-25 माणसांच्या जेवणापासून कपडे धुणं, भांडी घासणं, गाड्या धुणं अशी सगळी कामं तिच्या एकटीवर टाकण्यात आली. एकट्या बाईला इतकी कामं करणं अशक्यच होतं, मात्र तरीही काही दिवस फरीदानं हे निमूटपणे सहन करत काम केलं. मात्र कामात छोटीशीही चूक झाली तरी शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवून छळ करणं असे प्रकार होऊ लागल्यानंतर फरीदा धास्तावली. या सगळ्या छळाला कंटाळून तिनं काम सोडून भारतात परतण्याची मागणी केल्यानंतर तर तिचं तिच्या घरच्यांशी बोलणंही बंद करण्यात आलं. त्यामुळं काळजीत पडलेल्या तिच्या घरच्यांनी इकडे राज्य महिला आयोग आणि परराष्ट्र खात्याकडे मदतीची याचना केली. त्याची दखल घेत ओमानमधील भारतीय उच्चायुक्तांनी फरीदाची शोधाशोध सुरु केल्यावर तिच्या मालकानं घाबरुन तिची सुटका केली आणि एजंटच्या मदतीनं तिला भारतात माघारी धाडलं. या सगळ्यानंतर आता पैशांच्या हव्यासापोटी आखाती देशात कुणीही जाऊ नका, असं आवाहन फरीदा करतेय याप्रकरणी लोकांना फसवून आखाती देशात गुलाम म्हणून पाठवणाऱ्या स्थानिक एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्याची तिची मागणी आहे. शिवाय आखाती देशात अशाप्रकारे अनेक भारतीय लोकांना गुलाम म्हणून डांबून ठेवल्याचंही फरीदा सांगते. संबंधित बातम्या : अंबरनाथच्या महिलेची ओमानच्या नरकयातनेतून सुटका

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
Mumbai Rajbhavan : खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget