नवी मुंबई : सोलापूर जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या तुकाराम मुंढेंनी नवी महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांच्या कामाची झलक पहायला मिळाली.
तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व विभागांना भेट देत झाडाझडती घेत कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं.
विशेष म्हणजे, पदभार स्वीकारण्यासाठी कार्यालयात पोहोचलेल्यां मुंढेंनी आधी संपूर्ण कार्यालयात फिरुन थेट कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांना राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांचं वर्चस्व असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.