मुंबई: विद्याविहार स्टेशनजवळ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास विटांनी भरलेला ट्रक उलटला. टायर फुटल्याने ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये 5 मजूर होते, त्यातील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना राजावाडी रुग्णलयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

या ट्रकखाली आणखी मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या ट्रकमधील विटा काढून ट्रक रिकामा करण्यात येत आहे. रेल्वेच्या कामासाठी ठेकेदार ट्रक भरुन विटा घेऊन आला होता. स्टेशनजवळ ट्रक आला असता हा ट्रक पलटी झाला.

विद्याविहार पश्चिम येथील तिकीट खिडकीजवळ हा अपघात झाला. यामुळे प्रवाशांना जाण्यासाठी रोखण्यात आलं आहे. या वीटा काढण्याचं काम सुरु असून कुर्ला रेल्वे पोलीस तसेच घाटकोपर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर आहेत.