एक्स्प्लोर

मराठा मोर्चातून परतताना बाईकला ट्रकची धडक, दोघांचा मृत्यू

मुंबईतील वडाळा भागात भीषण अपघात, मराठा मोर्चातून परतणाऱ्या तरुणांच्या बाईकला ट्रकची बाईकला धडक

मुंबई : मुंबईतल्या वडाळा भागात भरधाव ट्रकच्या धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 तरुण गंभीर जखमी झाला आहे. विनायक ढगे, सिद्धेश मासे अशी मृत तरुणांची नावं आहेत, तर सिद्धेश चव्हाण अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मराठा मोर्चात सामील होऊन घरी परतत होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. अपघात कसा झाला? मुंबईतील वडाला भागातील भक्ती पार्क सर्कलजवळ ट्रकने तीन बाईकना धडक दिली. बुधवारी (9 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारस ही घटना घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. सायन हॉस्पिटलमध्ये जखमीला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. विनायक ढगे, विल्सम जोसेफ, सिद्धेश मासे आणि सिद्धेश चव्हाण हे चौघे बाईकवरुन जात घरी जात होते. मराठा मोर्चात सहभागी झाल्यानंतर चेंबूर येथील आपल्या घरी हे चौघेही परतत होते. भक्ती पार्कच्या दुसऱ्या बाजूने विनायक आण विल्सन जोसेफ आयमॅक्स थिएटरच्या दिशेने जात होते. भक्ती पार्क मोनो रेल स्टेशनजवळ ते थांबले होते. विनायक रस्ता क्रॉस करुन सिद्धेश मासे आणि सिद्धेश चव्हाण यांच्याशी बोलण्यासाठी जात होता, तेवढ्यात वेगाने येणाऱ्या ट्रकने विनायक, सिद्धेश मासे आणि सिद्धेश चव्हाण यांना जोरदार धडक दिली आणि ट्रक डिव्हायडरवर चढला. यामध्ये विनायक ढगे याचा जागीच मृत्यू झाला, तर सिद्धेस मासे आणि सिद्धेश चव्हाण गंभीर जखमी झाले होतेे. त्यांना जवळील सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी सिद्धेश मासेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सिद्धेश चव्हाणची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी ड्रायव्हर अटकेत पोलिसांनी आरोपी ट्रक ड्रायव्हरला अटक केली असून, त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ड्रायव्हर मोहम्मद कलीम शेख याची वैद्यकीय तपासणी केली असून, अपघातावेळी ड्रायव्हर दारु प्यायला होता का, याची चौकशीही पोलिस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget